Breaking News
धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात एकमताने अविश्वास ठराव मंजूर
धुळे जिल्हा प्रतिनिधी -
धुळे जिल्ह्यातून एक खळबळ जनक बातमी समोर येत असून प्राप्त माहितीनुसार धुळे जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही जिल्हा परिषद सदस्यांकडून बहुमताने प्रस्ताव पारत पारित करत धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करून त्यांची नियक्ती रद्द करून त्यांना प्रशासनाकडे परत पाठवणे बाबत
एकमताने व बहुमताने प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.
त्यांच्या कामकाजाविषयी जिल्हा परिषद सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे जिल्हा परिषद मधील एकूण 56 सदस्यांपैकी 51 सदस्यांनी या अविश्वास ठराव ला मंजुरी दिली असून जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दिलेल्या पत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांना धुळे जिल्हा परिषद अधिकार पदावरून परत शासनाकडे परत पाठवण्याबाबत प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
सदर प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे की शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे हे दैनंदिन कामकाज करतांना जिल्हयातील प्रशासकीय व विकास कामांच्या संदर्भात निर्णय घेतांना जिल्हा परिषदेतील पदाधिकारी, सदस्य यांचे शो पूर्व चर्चा न करता व कोणत्याही प्रकारचा विचार विनियम न करता परस्पर निर्णय घेत असतात त्यामुळे जिल्हयातील विकास कामांच्या अंमलबजावणी करतांना जिल्हा परिषद पदाधिकारी यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सबब मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धुळे यांची सेवा, जिल्हा परिषद प्रशासनास जिल्हयातील ग्रामिण जनतेस हितकारक नसुन जिल्हयातील ग्रामिण विकासास बाधा आणणारी आहे. त्यांच्या गैरवर्तणुकीमुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत आहे. याबाबत आम्हा सदस्यांची भावना तीव्र असुन त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळुन श्री शुभम गुप्ता यांना अधिकार पदावरुन पस्त शासनाकडे पाठविणेबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या ९४ (३) नुसार आम्हांस प्रदान केलेल्या अधिकारानुसार आम्ही स्वाक्षरी करणार दिनांक १३/०३/२०२४ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव करत आहोत असे नमूद केले आहे.
याबाबत झालेल्या मीटिंगमध्ये जिल्हा परिषद सदस्यांकडून अनेक प्रकारचे गंभीर आरोप यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील बहुचर्चित भास्कर वाघ कांड नंतर पुन्हा एकदा या अधिकाऱ्यांमुळे धुळे जिल्हा परिषदेला बदनामी सहन करावी लागत आहे असा देखील आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे या बातमीवरून सध्या तरी धुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
