महात्मा ज्योतीबा फुले व डाँ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समीती अध्यक्षपदी राहुल जाधव यांची निवड




महात्मा ज्योतीबा फुले व डाँ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समीती अध्यक्षपदी राहुल जाधव यांची निवड

नंदुरबार : नंदुरबार यथील समता युवामंच तथा महात्मा ज्योतीबाफुले व परमपुज्य डाँ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समीती निमीत्त सर्व समाज बांधव, विविध संघटना पक्षाचे पदाधीकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थीतीत पार पडलेल्या जयंती उत्सव समीती आयोजन मिटींगमध्य युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल शाताराम जाधव यांची सर्वांनुमते अध्यक्षपदी निवड केल्या बद्दल सर्व समाज बांधवाकडुन त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात यत आहे .
नवनियुक्त अध्यक्ष राहुल जाधव यांचे मा आमदार भैय्यासाहेब चंद्रकांत रघुवंशी साहेब यांनी शुभेच्छा दिल्या व या वेळी किरण तडवी रावसाहेब ड्रीम कंन्ट्क्शन  व रविंद्र अशोक पवार माजी नगराध्यक्ष नंदुरबार यांनीही पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले
अध्यक्षपदी निवड झाले बाबत राहुल शांताराम जाधव यांनी सर्व समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार मानताना म्हटलेकी  " सर्व समाज बांधव  विविध संघटना पक्षाचे पदाधीकारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या एकतेने सर्वानुमते महात्मा ज्योतीबा फुले तथा डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीती अध्यक्ष पदी माझी निवड केली आणि मला या पदी लायक समजले व सर्व समाज बांधवांनी माझ्यावर एक मताने विश्वास दर्शवला आणि क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबाफुले , विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या विश्ववंदनिय महान राष्ट्पुरुषांच्या जयंती उत्सवाची माझ्यावर जबाबदारी सोपवली त्या बद्दल मि सर्व समाज बांधवांचा शतशः ऋणी राहीन आपण सर्वांनी या टाकलेल्या जबारीची मि निश्चीतच जाणीव ठेवत जयंती उत्सव शांततेत उत्साहात कायदा सुवेवस्थेचा मान राखत पार पाडण्यासाठी अध्यक्ष या नात्याने  मि स्वता व समीतितील पदाधीकारीं व मान्यवर समाज बांधव जेष्ठांचे  सामाजिक कार्यकर्त्यांचे दिशा मार्गदर्शन घेत  विश्वशांतीचे दुत महामानव गौतम बुध्द ,महात्मा ज्योतीबा फूले ,परमपुज्य डाँ बाबासाहेब आंबेडकर ,यांनी दिलेल्या  विचार तत्व मार्गाला शिकवणुकीला व त्यांच्या महान कार्याला अनुसरुनच जयंती उत्सव परीश्रमपुर्वक यशस्वीरित्या पार पाडीन "
जयंती उत्सव मिटींगला ज्यांनी जेष्ठ  सल्लागार म्हणुन मार्गदर्शन केले ते सर्व जेष्ठ सामाज बांधव व समता युवामंच सुभाषदादा पेंढारकर, सुभाषभाऊ पानपाटील , व उत्सव समीती कायदेविषयक सल्लागार अँडव्होकेट प्रेमानंद ईंद्रजित , रामदादा साळुंखे, रवीभाऊ रगडे, भैय्याभाऊ बावीस्कर, सचीनभाऊ पिंपळे, किरणभाऊ गवळे, विकासदादा सोनवणे, मुकेशभाऊ घोडसे,  राहुलभाऊ रामराजे, गौरवभाऊ महीरे , रूपेशभाऊ बत्तीसे, गणेशभाऊ मोरे, आकाशभाऊ जाधव 
नवनियुक्त उत्सव समीती पदाधीककारी उपाध्यक्ष राहुलभाऊ रामराजे, सचीव जवाहर पवार, खजीनदार भैय्याभाऊ बावीस्कर व सर्व सल्लागार मार्गदर्शक जेष्ठ व युवा सामाजिक कार्यकर्ते या यावेळी उपस्थीत होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने