तोंदे येथे अंगणवाडीतील खिचडी खाल्याने विद्यार्थ्यांना झाल्या उलट्या
बभळाज/प्रतिनिधी
शिरपूर ता.तोंदे येथील अंगणवाडी क्रमांक १ येथे अंगणवाडी सेविका उषा पाटील यांनी सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना खिचडी वाटप केली.खिचडी खाल्याने सोनम नानुभाऊ भिल वय साडेतीन वर्ष,आकृती पिंट्या भिल वय चार वर्ष,ईश्वरी पावरा वय साडेचार वर्ष या विद्यार्थ्यांना मळमळ व उलटी झाल्याचे लक्षात आल्याने बाकीच्या विद्यार्थ्यांना खिचडी खाण्यास मनाई करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना कळताच त्यांनी लागलीच विद्यार्थ्यांना हीसाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.हीसाळे आरोग्य केंद्रात मानव विकास कॅंप असल्याने सर्व डॉक्टर उपस्थित असल्याने डॉ . दिनेश जैन व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार केले.पकृती स्थिर झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.३ वाजेपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी व २ वाजेपर्यंत अंगणवाडी सेविका आरोग्य केंद्रात पोहचले नव्हते.आमच्या प्रतिनीधीने संबंधीत अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता २ वाजता संपर्क झाला.३ वाजेनंतर बालविकास अधिकारी वैशाली निकम या घटनास्थळी पोहोचल्या.या वेळी विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी आपला संताप व्यक्त केला.वैशाली निकम यांनी योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जितेंद्र पाटील, पोलीस छोटुलाल पाटील (पोलीस पाटील) डॉ.दिनेश जैन,दिपक कोळी व गावकरी उपस्थित होते.पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली.
