धुळे नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकी आधीच विजय पराजयाच्या दावा कॉलिंग वर्ड च्या सर्वेत सुशिलकुमार पावरा जिंकले;के. सी. पाडवी व हिना गावित,इतरही हारले!




धुळे नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकी आधीच विजय पराजयाच्या दावा

कॉलिंग वर्ड च्या सर्वेत  सुशिलकुमार पावरा जिंकले;के. सी. पाडवी व हिना गावित,इतरही हारले!



शहादा:आगामी लोकसभा निवडणूकीत नंदूरबार लोकसभा मतदारसंघात तुमचे मत कोणाला,म्हणून स्ट्रा पोलवर दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सोशल मिडीयावर लिंक टाकण्यात आली.५०० पेक्षा अधिक वाॅटसप ग्रूपवर ही मतदानाची लिंक टाकण्यात आली.त्यात मा.सुशिलकुमार पावरा- बिरसा फायटर्स, मा.के.सी.पाडवी- काँग्रेस, मा.हिना गावित-बिजेपी व इतर असे पर्याय ठेवण्यात आले.यात बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे जिंकले आहेत.११ तासापूर्वी मतमोजणी केली असता एकूण १७१४ मतदारांनी मतदान केले.बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना  ६७५  मते पडली तर विरोधक काँग्रेसचे के.सी.पाडवी व भाजपच्या  हिना गावीत तसेच इतर उमेदवार सुद्धा हारले आहेत. काँग्रेसचे के.सी.पाडवी यांना ५०८ मते पडली तर भाजपच्या हिना गावित यांना ३०० मते पडली व या तिघांव्यतिरिक्त  इतर उमेदवारांना २३१ मते पडली.बिरसा  फायटर्सने ऑनलाईन पोलींग वोटवर नंदूरबार लोकसभा जिंकल्याबद्धल अभिनंदन व कौतुक केले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत बिरसा फायटर्स उमेदवारांनी पक्षांच्या उमेदवारांना धक्का देत २६ ग्रामपंचायतची   निवडणूक जिंकली होती.त्यामुळे हा पोलींग वोटचा निकाल सुद्धा काँग्रेस व भाजप उमेदवारांना धक्का देणारा व आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज देणारा ठरला आहे.
                       नंदूरबार लोकसभेसाठी काँग्रेस कडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून के.सी.पाडवी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.तर भाजप कडून म्हणजेच महायुतीकडून विद्यमान खासदार हिना गावित यांनाच  उमेदवारी मिळेल,असे सांगण्यात येत आहे. भाजप सरकार कडून आदिवासी विरोधीधोरण यामुळे आदिवासी बहूल असलेल्या नंदूरबार जिल्ह्य़ात भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे,त्यामुळे आदिवासी मतदारांची  मते भाजपच्या उमेदवार हिना गावित यांना मिळणार नाहीत, असे चित्र दिसत आहे.काँग्रेसचे अक्राणी अक्कलकुव्याचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी हा बिनकामाचा माणूस आहे.त्यांनी ३५ वर्षांच्या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या असली या गावात सुद्धा जायला रस्ता केला नाही,तो माणूस काय जिल्ह्य़ाचा विकास करेल?अक्राणी व अक्कलकुवा मतदारसंघात अद्यापही  खड्डेमय रस्ते आहेत. रोजगार नाही,म्हणून अजूनही आदिवासी बांधव गूजरातमध्ये ऊसतोडीसाठी व पंढरपूर अशा विविध भागात मजूरीसाठी जातात, आदिवासींचे स्थलांतर थांबतच नाही.अशा आमदार के.सी.पाडवी यांच्या निष्क्रिय कामगिरीमुळे प्रचंड नाराज असलेला युवा मतदार वर्ग जिल्ह्य़ात निर्माण झाला आहे.
                    अशा वातावरणात मतदारांचा एकमेव पर्याय म्हणून बिरसा फायटर्सचे नंदूरबार लोकसभेचे उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना पसंती वाढत आहे.भावी खासदार सुशिलकुमार पावरा नावाचा वाॅटसप ग्रूपवर १०२५ सदस्य होऊन ग्रूप फूल हाऊस झाला आहे.म्हणून एकाच नावाचे  ३ स्वतंत्र ग्रूप तयार करण्यात आले आहेत. बिरसा फायटर्सचा उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना मानणारा मोठा शिक्षित मतदार वर्ग समोर येत आहे.international idol, राष्ट्रीय कलामित्र, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, शिक्षक, कवी,लेखक,समाजसेवक, गायक, नृत्यक,  कराटेपटू आणि ५०० वेळा उपोषण करणारे आदिवासींचे अण्णा हजारे अशी चांगली ओळख सुशिलकुमार पावरा यांची जनमानसात आहे.
                   बिरसा फायटर्स संघटनेचे महाराष्ट्रात ३५६ पेक्षा अधिक शाखा आहेत. २ लाखापेक्षा अधिक सभासद आहेत. २६ लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायतींवर सत्ता आहे.संघटनेत शिक्षक,डाॅक्टर, वकील,आर्मी,पहिलवान, गायक, नृत्यक, संगितकार, लेखक, कवी,पत्रकार,शेतकरी,मजूर, विद्यार्थी,महिला तसेच आमदार, जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचाही समावेश आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने