शिरपूरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीतिथीनुसार साजरी*




*शिरपूरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीतिथीनुसार साजरी*

*शिरपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार शिरपूर येथे दि. 28 मार्च रोजी साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी मार्केट मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते मार्ल्यापन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप लोहार, शिवसेनेचे उबाठा गटाचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू टेलर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भरतसिंग राजपूत, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पाटील, शिवसेना तालुका संघटक पिंटू शिंदे, शिरपूर मर्चंट बॅन्क माजी संचालक महेश लोहार, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, भटू राजपूत आदि उपस्थित होते. यावेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकारच्या घोषणा देण्यात आल्या.*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने