आरोपी लड्डू पाटील याचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला*
शहादा: शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील ६ पेक्षा अधिक आदिवासी मुलांना हरभ-याच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग येऊन मामा मोहिदा येथील लड्डू पाटील व त्यांच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली.मारहाणीत मुलांचे तोंड सुजले, कपडे फाटले व शरिराच्या इतर अवयवांना जबर दुखापत झाली आहे. आरोपींविरुद्ध भा.द.वि.क. ३२३,५०४ सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (1)(R)(S),3(2)(VA) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी हे पाटील समाजाचे असल्याकारणाने गुन्ह्याचे कलम वाढवण्यास व आरोपींना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत, म्हणून आदिवासी समुदायातर्फे दिनांक २ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा( मा.प्रांतअधिकारी कार्यालय ) पासून ते मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा जि.नंदुरबार पर्यंत आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आले.यात शहादा तालुक्यातील विविध आदिवासी संघटना शामिल झाल्या होत्या.परंतु राजकीय पक्षांचा एकही आदिवासी लोकप्रतिनिधी शामिल झाला नव्हता.मोर्चा स्थळी पोलिसांनी मोर्चेक-यांशी संवाद साधला.आरोपी लड्डू पाटील हा फरार आहे. त्याला अटक करायला आम्ही त्याची घरी गेलो होतो. तो सापडत नाही.कुणाला दिसला तर पोलीसांशी संपर्क साधावा,आम्हाला लवकरच त्याला अटक करू,असे आवाहन शहादा पोलिसांनी केले.
आरोपी लड्डू पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत जिल्हा सत्र न्यायालय शहादा येथे अटकपूर्व जामीन मिळावा,म्हणून अर्ज केला होता.त्या अर्जावर दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सुनावणी झाली असून आरोपी लड्डू पाटीलचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने नाकारला आहे.पोलीसांनी आतातरी आरोपींना अटक केली पाहिजे.पोलीस आरोपीला अटकपूर्व जामीन मिळण्याची वाट बघत आहेत का? अशी उलट सुलट चर्चा जनतेमध्ये रंगली आहे.
