उद्या इंदापुरात होणार राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा प्रतिनिधी दत्ता पारेकर




उद्या इंदापुरात होणार 
 राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा 

प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे :इंदापूर तालुक्याततील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने
उद्या बुधवार,दि.६ मार्च २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रवाटप कार्यक्रम व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
   नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना
 सुनेत्रा पवार यांच्या हस्ते व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली,तसेच प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
यांच्यासह अनेक मान्यवरांच्या विशेष  उपस्थितीत करण्यात येणार असून या प्रसंगी विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी,गावोगावचे सरपंच-उप सरपंच-सदस्य तसेच आजी-माजी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा मेळावा वाघ पॅलेस,इंदापूर येथे याठिकाणी पार पडणार आहे.

या मेळाव्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन 
श्री.हनुमंत कोकाटे तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,
श्री.बाळासाहेब ढवळे इंदापूर शहराध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस ,
श्री.अतुल झगडे कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 
 संदेश देवकर मुख्य प्रवक्ते व माध्यम प्रमुख,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,
श्री.अक्षयभैय्या भोसले
तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस,सामाजिक न्याय विभाग ,
सौ.साधनाताई केकाण तालुकाध्यक्षा,राष्ट्रवादी महिला काँग्रेस, 
ॲड.शुभम निंबाळकर तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस , 
श्री.सचिन खामगळ कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस,
ओंकार सरडे तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी विद्यार्थी  काँग्रेस ,
फ्रन्टल सेलचे सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी,इंदापूर तालुका. यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने