रोटरी स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा* दोडाईचा (मुस्तुफा शाह)




*रोटरी  स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा* 
दोडाईचा (मुस्तुफा  शाह) 
 दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगावंकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये 'जागतिक महिला दिन' डॉ. युतिका भामरे, सौ. मनिषा गुजराती, सौ. हेतल शाह, इंचार्ज बतुल बोहरी, महिला पालक व शिक्षक वर्ग यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व, मोनोॲक्ट, गीतगायन, नृत्य, प्रश्नमंजुषा स्पर्धेत महिला पालक व शिक्षिकांनी सहभाग नोंदवला.
 वक्तृत्व स्पर्धेत माधुरी गुरव, मोनो  ॲक्टमध्ये धनश्री अडगाळे विजयी झाल्या. गीतगायन स्पर्धेत राणी पाटील प्रथम ,भारती चव्हाण द्वितीय,ज्योती निकवाडे तृतीय. नृत्य स्पर्धेत मोनिका तोरवणे प्रथम, जया सोनवणे द्वितीय, धनश्री अडगाळे तृतीय, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत सावित्रीबाई फुले गटाने प्रथम क्रमांक मिळविला. विजयी सर्व स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.परीक्षक म्हणून सौ.मनिषा गुजराथी, हर्षाली राजपूत, मोनी शर्मा,ललिता गिरासे, अंजना राजपूत यांनी काम पाहिले.
 कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या  डॉ. युतिका भामरे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महिलांनी कौटुंबिक व समाजहिताची जबाबदारी पार पाडत असताना वेळेचे नियोजन करावे. नियमितपणे व्यायाम करून व पौष्टिक आहार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.तर संगीतविशारद सौ. मनिषा गुजराथी यांनी महिलांनी समाजहिताचे कार्य केल्यास त्या कार्याची दखल घेऊन तुमचा भविष्यात सन्मान केला जाईल. अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले.महिला पालकांनीही कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील, निकिता जैन व  सुवर्णा जाधव यांनी केले, तर आभार किर्ती शाह यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने