*राज्यस्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत रोटरी स्कूलचा संघ उपविजेता*
दोडाईचा (मुस्तफा शाह)
महाराष्ट्र राज्य मॉन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन व नंदुरबार जिल्हा मॉन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षाआतील मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले असून त्यांची सुरत येथे होणाऱ्या राष्ट्रीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते. रोटरी स्कूलच्या स्मित शाह, आयुषमान बच्छाव, राज ठाकरे महिपालसिंह राजपूत, सुमित गिरासे, द्रुपल प्रजापती, लोकेश मोरे, श्रोणीत जाधव यांच्या संघाने जळगाव संघासोबत अंतिम सामना करून उपविजेतेपदाचे पारितोषिक पटकावले.नंदुरबार जिल्हा मॉन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री दिनेश बैसाणे यांच्या हस्ते खेळाडूंना ट्रॉफी,मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक अजय हजारे व जितेंद्र भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. राजेश टोणगांवकर, संचालक मंडळ, प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांनी अभिनंदन व कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
