शिरपुर विधानसभा मतदार संघा अंतर्गत प्रभात फेरी द्वारे मतदार जागृती
शिरपूर प्रतिनिधी - आगामी काळात होणाऱ्या शिरपूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत निवडणुकीच्या अंतर्गत प्रभात फेरीद्वारे मतदार जागृती मोहीम शिरपूर तहसील कार्यालय मार्फत राबविण्यात आली.
दिनांक १ ३ - ०३ . २०२४ रोजी SVEEP अंतर्गत तहसील कार्यालय शिरपूर यांचे मार्फत मतदार जागृती पर रॅली काढण्यात आली .
आर सी पटेल महाविद्यालय , आर.सी पटेल माध्यमिक विद्यालय ,एच आर पटेल माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालय येथे सुरू करून कुंभार टेक, अंबिका नगर ,मार्केट जवळून तहसील कार्यालय येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
सदर रॅलीला तहसीलदार महेंद्र माळी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले सदर कार्यक्रमास तहसीलदार महेंद्र माळी यांची समवेत नायब तहसीलदार कुमावत साहेब , संजय सोनार परदेशी नाना , विशाल तेले नोडल अधिकारी श्रीमती नीता सोनवणे धुळे येथून आलेले शाहीरशाहीर हे उपस्थित होते.
सदर रॅलीत सुमारे दीडशे विद्यार्थी सहभागी होते तसेच त्यांच्या समवेत त्यांची शिक्षक प्राध्यापक हे देखील उपस्थित होते. त्यामुळे या रॅलीतून मतदार जनजागृती करण्यात आली.


