नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भक्तांचे वाघाडी गावात जल्लोषात स्वागत




नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भक्तांचे वाघाडी गावात जल्लोषात स्वागत

शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील भक्त दयाराम डिगंबर पाटील ,रामकृष्ण फकिरा पाटील
मच्छिद गोसावी, सुरेश चौधरी,गोपाळ न्हावी,मगण खंडू पाटील व खामखेडे करभोंगे महाराज असे सात वयोवृद्ध तसेच तरुण भक्तांनी माता नर्मदे चे परिक्रमा करून ३६०० किलो मीटर पदयात्रा ८४ दिवसात संपन्न केली.



या सर्व भक्तांचे वाघाडी नगरीत दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ पदार्पण झाल्यानंतर संध्याकाळी संपूर्ण गावकऱ्यांनी, वारकरी मंडळांनी टाळ मृदंगाच्या सहवासात मिरवणूक काढून या सर्वांचे पुष्पहार अर्पण करून जल्लोषात स्वागत केले.
समस्त महिला वर्ग व ग्रामस्थांच्या सहकार्याने
गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली..
 यावेळी संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.



याप्रसंगी वाघाडी चे लोक नियुक्त सरपंच  किशोर विठ्ठल माळी,तसेचवाघाडी गावातील जेष्ठ नागरिक, माजी ग्राम तंटा मुक्त अध्यक्ष,अखिल भारतीय माळी महासंघ शेतकरी संघटना धूळे जिल्हा अध्यक्ष श्रीराम दयाराम माळी यांनी सर्वांचे स्वागत केले. या स्वागत प्रसंगी सिताराम वेडू देशमुख,माजी मुख्य.  एस .पी. बोरसे, महेश लोटण माळी,सतिष बाजीराव भामरे, सुनिल महाजण, संतोष मराठे,भगवान वेडू पाटील,शिवाजी देवचंद पाटी, दिवान दगडु माळी , बाळू जैन, शशिकांत देशमुख,गजानण चौधरी, भटू हरि पाटील, बापूसाहेब सदानंद गोसावी,सुनिल नथ्या माळीमंगेश ठाकूर, विनोद माळी, आबा रामकृष्ण पाटिल,साहेबराव माळी, रतीलाल गोसावी आबा गोसावी, मगेश पाटील,मुरलीधर माळी,दादाभाऊ मेटकर,जगनाथ पाटील , लक्ष्मण देशमूख, किशोर चौधरी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.सर्व गावकरी व महिला भक्तांनीशोभायात्रे साठी श्रध्दा भावाने
परिपूर्ण सहभाग व परिक्षम घेतले.कार्यक्रमाला  वारकरी संप्रदाय वाघाडी   तसेच. भजनी मंडळ वाघाडी. बजरंग मित्र मंडळ वाघाडी तरुण वर्ग वाघाडी सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रम सुरळीत पार पाडला.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने