वैश्याव्यवसाय चालविणा-या महिला व पुरूष असे एकूण 17 आरोपींना मा.सत्र न्यायालयाने ठोठावली 10 वर्षे कारावासाची शिक्षा व 1,19,000/- हजार रुपयांचा दंड...!
शहादा पोलीस ठाणे हद्दीतील भाजी मंडईच्या पाठीमागे एका घरात काही व्यक्ती, महिला व अल्पवयीन मुलींकडून वैश्याव्यवसाय चालवून घेत असल्याची माहिती रेस्क्यू फाउंडेशन, पुणे यांनी शहादा पोलीस ठाणे येथे हजर राहून खबर दिल्यावरुन पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी व शहादा पोलीस निरीक्षक, महिला अधिकारी, स्टाफ, पंच अशांसह सदर ठिकाणी नियोजित छापा टाकुन 2 महिला व पिडीतेला ताब्यात घेण्यात आले होते. त्याअन्वये शहादा पोलीस ठाणे गु.र.नं. 05/2017 स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी बुधवंत हे स्वत: करीत होते. श्री.बुधवंत यांनी गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. त्यामध्ये अल्पवयीन मुली व पिडीत महिला यांना राजस्थान, काठमांडू नेपाळ, ओरिसा पश्चीम बंगाल येथून घरगुती कामाचे जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून वैश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे स्पष्ट झाल्याने सदर गुन्हयाचे तपासात एक मोठे रॅकेट असल्याचे निष्पन्न होत गेले व त्यामध्ये मा.सर्वोच्च न्यायालय यांनी अधिकचे तपासकामी SIT स्थापन करुन तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. प्रशांत वाघुंडे यांचेकडे तपास सोपविण्यात आला होता. श्री.प्रशांत वाघुंडे यांनी तपासि अधिकारी म्हणून गुन्हयाचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने सखोल तपास केला व गुन्हयातील महिला व पुरूष आरोपींना अटक करुन मा.न्यायालयात हजर करण्यात आले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याचे विरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र मा. सत्र न्यायालय नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. आर.जी. मलशेट्टी, नंदुरबार यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात खबर देणार फिर्यादी, गुन्हयातील पिडीत महिला, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तसेच तांत्रिक पुरावे, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपींविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने अति.जिल्हा व सत्र
न्यायाधीश, नंदुरबार यांनी गुन्हयातील 17 आरोपींना PITA कायदयान्वये दोषी ठरवत प्रत्येकी 10 वर्ष कारावास व रुपये 1,19,000/- रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने माजी अति.सरकारी अभियोक्ता ॲड.श्री. सुशील पंडीत व अति.जिल्हा सरकारी वकील श्री. व्ही.सी.चव्हाण यांनी काम पाहिले होते. तसेच पैरवी अधिकारी पोनि-श्री.अर्जुन पटले, पोउपनि-श्री. राहुल भदाणे, पैरवी अंमलदार पोहेकॉ/170 नितीन साबळे व पोना/947 गिरीश पाटील यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति.सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार यांनी अभिनंदन केले आहे.
