म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत खेडदिगर येथील बॉर्डर नाकाबंदी दरम्यान विमल गुटखा साठा जप्त
शहादा तालुका प्रतिनिधी... सुमित गिरासे
शहादा तालुक्यात म्हसावद पोलीस ठाण्याची आणखी एक दमदार व धडाकेबाज कामगिरी
म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत खेडदिगर येथील बॉर्डर नाकाबंदी येथे पो.नि.राजन मोरे, पीएसआय जितेंद्र पाटील, बहादूर भिलाला, दादाभाई साबळे, शैलेश राजपूत, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, उमेश पावरा, मोहन साळवे,काशिनाथ साळवे,कलीम रावताडे, हे कारवाई करीत असताना पिकअप वाहन क्रमांक MH -39-C-6575 चा चालक हा आपल्या ताब्यातील वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटका घेऊन जात असल्याची गोपनीय खात्रीलायक माहिती म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांना मिळाल्याने सदर वाहनाचा दोन टीम करून स्टाफ सह पाठलाग करून दरा-गावाजवळ त्यास पकडण्यात आले असता त्याच्या ताब्यातील वाहनात *तीन लाख रू.किंमतीचा विमल गुटखा व सुगंधित पान मसाला तंबाखू*
व *साडेतीन लाख रू.किमतीचे पिकअप वाहन*
*असे एकूण साडे सहा लाख ₹ किमतीचा माल पकडण्यात आला.*
आरोपी नामे आकाश दिलीप ढोले,राहणार वडफळ्या ता.धडगाव,जिल्हा नंदुरबार,
याच्याविरुद्ध गु. नों. क्र.75/24 भादवि कलम 328,188,272,273,
सह अन्नसुरक्षा मानदे अधिनियम 2006 चे कलम 26(2)(4),30(2)(A)., कलम 239/177 मो. वा. कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. स. ई. जितेंद्र पाटील करीत आहेत.
