शहादा नंदुरबार जिल्हा वाहतूक शाखेकडून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई





शहादा नंदुरबार जिल्हा वाहतूक शाखेकडून नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई

शहादा,  : नंदुरबार जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने शहादा शहरात शनिवारी अचानक वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात शहरातील स्टेट बँक,डॉ. बाबासाहेब पुतळ्याजवळ तसेच नगरपालिका जवळ पोलिसांकडून तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात दोनशे पेक्षा अधिक मोटरसायकली आणि इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सलग सुरू राहणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी विना कागदपत्राची वाहने वापरले जात असल्याचे आढळून आल्याने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त  यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने जिल्ह्यात ठिक ठिकाणी वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात केली आहे. शहादा शहरात अचानक वाहतूक शाखेच्या वतीने वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी केली यात अनेक  वाहनधारकांकडे कागदपत्रे, लायसन्स ,वाहतूक नियम न पाळणे आदी कारणांमुळे पथकाने कारवाई केली. त्यात २०० पेक्षा अधिक मोटरसायकल आणि इतर वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.वाहतूक पोलिसांच्या वतीने अचानक वाहन तपासणी मोहीम सुरू झाल्याने विना कागदपत्रे वाहन वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने