इंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा मराठा आंदोलनास पाठिंबा मराठा समाजाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या बद्दल केले ऋण व्यक्त प्रतिनिधी दत्ता पारेकर




इंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा मराठा आंदोलनास पाठिंबा 

मराठा समाजाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या बद्दल केले ऋण व्यक्त 

प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा लढा जोमाने सुरू आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत. मंगळवारी दिनांक 20/ 2/224 रोजी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवले आहे. त्याच अधिवेशनात मराठा आरक्षणाला आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाठिंबा द्यावा व विधानसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करावा या मागणीसाठी  मराठा समाजाच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी आंदोलन केले.
 आमदार दत्तात्रय भरणे यांनी आंदोलन कर्त्याला पाठिंबाचे पत्र दिले. आमदार भरणे यांनी पाठिंबाचे पत्र देताच मराठा अंदोलानचे समन्वयक प्रविण पवार यांनी आंदोलकांची परवानगी घेऊन आमदार भरणे यांच्याबद्ल ऋण व्यक्त केले‌‌.

आमदार भरणे यांनी आपल्या मनोगतात माझा व माझ्या पक्षाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे असे सांगितले.

भरणेवाडी अंदोलक म्हणून मेजर महादेव सोमवंशी, अमर गाडे ,प्रविण पवार, पवन घोगरे, रोहित उर्फ बंडा पाटील, निलेश देवकर, मनोज जगदाळे, पद्मसिंह जाधव,आप्पासाहेब डोंगरे, धनाजी गलांडे,विकास भोसले, भाऊसाहेब शिंदे व इतर उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमदार भरणे यांच्या निवासस्थानी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आमदार भरणे यांनी कांदलगाव येथे देखील आमरण उपोषणास बसलेल्या युवकांची कांदलगावत  जाऊन भेट घेतली त्यांनीही पाठिंबा असल्याचे  पत्र उपोषणकर्त्यांना दिले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने