दिपक विलास पाटील यांची इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री अमोल भिसे यांचे कट्टर समर्थक वनगळी विविध कार्यकारी सोसायटी चे व्हाईस चेअरमन श्री दीपक विलास खरात -पाटील वनगळी तालुका इंदापूर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, दिपक पाटील हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत , तसेच ते वनगळी विकास सोसायटीचे सलग सात वर्षे झाले बिनविरोध व्हाईस चेअरमन आहेत.
पाटील यांना बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील ,कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, बारामती लोकसभा कार्याध्यक्ष अक्षय कोकाटे ,महिला अध्यक्ष छाया पडसळकर, जिल्हा उपाध्यक्ष समद सय्यद, तालुका उपाध्यक्ष सिकंदर बागवान, युवक अध्यक्ष अनिकेत निंबाळकर ,इंदापूर शहराध्यक्ष ईनायतअली काझी, शहर कार्याध्यक्ष डोनाल्ड शिंदे, महिला शहराध्यक्ष रेश्मा शेख, सामाजिक न्याय शहराध्यक्ष अनिल ढावरे ,सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्ष विकास खिलारे व दिपक पाटील याचे समर्थक उपस्थित होते.
