भिमाई आश्रमशाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी दत्तात्रय पारेकर
पुणे :वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळविण्यासाठी अप्रतिम रंगमंच.त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे विचारमंच म्हणजे विद्यालयात होणारे सांस्कृतिक महोत्सव होत.विद्यार्थ्यांनी मोठे होऊन आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढवावा असे आव्हान इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांनी केले.
इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात सर्व विभागाच्या वतीने भिमाई परिवार प्रस्तुत भीमरत्न सांस्कृतिक महोत्सवाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते दिवंगत रत्नाकर मखरे व बहुजन महामातांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा व पालकांचा रोपटे देत सत्कार केला.
यावेळी संस्थेअंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पुणे येथे प्रथम ऍक्टिव्हिटी कार्यशाळेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदकं देऊन सन्मान केला. पुणे येथे प्रथम ऍक्टिव्हिटी कार्यशाळेत आदर्श कर्मचारी म्हणून निवड झालेल्या अनिल मखरे यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला.
महोत्सवात विद्यार्थ्यांनी बुद्ध वंदनेने सुरुवात करुन मराठमोळी गीतं, हिंदी सिनेमातील गीते, भीमगीते,छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीते, जेजुरीचा खंडेराया,रिमिक्स गीते, लोकगीते, देशभक्तीपर गीते, कोळीगीते,लावण्या, आदिवासी नृत्य,मराठी नाटकं,साऊथची नृत्ये आदी कलाविष्कार सादर करत मायबाप रसिकांची मने जिंकली.
उपस्थित मायबाप रसिक श्रोत्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांना टाळ्यानी साथ देऊन रोखं बक्षिसे देत कौतुकाची थापही दिली.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, सचिव ॲड. समीर मखरे यांनी कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमास अविनाश कोथमिरे, कांतीलाल शेंडगे, संजय कांबळे, गोरख तिकोटे,संतोष मखरे, सायराभाभी आतार, अस्मिता मखरे,डॉ.अनार्या मखरे, नानासाहेब चव्हाण, ॲड.आण्णासाहेब कडवळे, ॲड.सूरज मखरे,अक्षय मखरे, तेजस मखरे तसेच आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नानासाहेब सानप, हिरालाल चंदनशिवे यांनी केले, तर आभार सविता गोफणे यांनी मानले.
स्नेहसंमेलन प्रमुख म्हणून प्राचार्या अनिता साळवे,गणेश शिंदे यांचेसह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम मुख्याध्यापक साहेबराव पवार यांचे नियंत्रणात पार पडला.

