अबब ग्रामसेवकाने मागितली ६,४७,००० /- रू. ची लाच एसीबीने केली रंगेहात अटक नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




अबब  ग्रामसेवकाने मागितली ६,४७,००० /- रू. ची लाच
एसीबीने केली रंगेहात अटक

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामसेवकाने विकास कामाच्या बिलाची रक्कम देण्याच्या निमित्ताने चक्क सहा लाख 47 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्याकडे तक्रार केल्याने या विभागाने सापळा रचून  कारवाई करत लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपी लोकसेवक व खाजगी इसम यांना रंगेहात  पकडले व त्यावर कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. त्यामुळे या घटनेचे वृत्त पसरतात पंचायत समिती परिसरात सण सणटी वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार हे अक्कलकुवा तालुक्यातील असून  तक्रारदार यांची पत्नी ग्रामपंचायत सिंदुरी , तालुका अक्कलकुवा येथे सन २०१६ ते २०२० कालावधीत सरपंच होत्या. यानंतर ग्रामपंचायतीवर शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर असलेले  रस्ता काँक्रिटीकरण , पेव्हर ब्लॉक बसवणे अशी विविध आठ प्रकारची ग्रामपंचायतीला मंजूर असलेली कामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहेत. नमूद कामे पूर्ण झाल्यानंतर कामांबाबतचे बिल ३२,३४,०००/- (बत्तीस लाख चौतीस हजार रुपये) ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडुन आले आहेत. नमूद कामांच्या बिलाचे चेक देण्याच्या मोबदल्यात वरील नमूद आरोपी लोकसेवक मनोज पावरा , ग्रामसेवक, पंचायत समिती , अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार. रा. दामोदर नगर, तळोदा व   आरोपी खाजगी इसम लालसिंग सिमजी वसावे, रा. गमण, तालुका अक्कलकुवा,  जिल्हा नंदुरबार. यांनी  ३२,३४,०००/- (बत्तीस लाख चौतीस हजार रुपये) या रकमेच्या वीस टक्के रक्कम म्हणजे  ६,४७,०००/-रु. लाचेची मागणी करून ,  ६,४७,०००/-रु. लाचेची रक्कम पंच व साक्षीदारां समक्ष स्वीकारली, म्हणून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी ही कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम,*पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मा.श्री.माधव रेड्डी सो.* अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. ,श्री.नरेंद्र पवार सो. वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.  यांच्या मार्गदर्शनाखाली       
राकेश आ. चौधरी पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार   पोहवा/विलास पाटील ,  पोहवा/देवराम गावित, पोना/संदीप नावाडेकर, पोना/नरेंद्र पाटील,  पोना/सुभाष पावरा, पोना/संदीप खंदारे, पोना/हेमंत महाले, चापोना/, जितेंद्र महाल ,समाधान वाघ, पोलीस निरीक्षक,   ला.प्र.वि. नंदुरबार.  माधवी वाघ पोलीस निरीक्षक,   ला.प्र.वि. नंदुरबार. पोहवा/विजय ठाकरे त्यांच्या पथकाने केले आहे. 

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो, जयचंद नगर, नंदुरबार दुरध्वनी क्रं. ०२५६४-२३०००९*
*टोल फ्रि क्रं. 1064*

          
 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने