शिरपूर फर्स्टच्या वतीने थाळनेर येथे जागर माय मराठी भाषेचा' अभिनव उपक्रम




शिरपूर फर्स्टच्या वतीने थाळनेर येथे जागर माय मराठी भाषेचा' अभिनव उपक्रम

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी घेतली मराठी भाषेच्या संवर्धनाची प्रतिज्ञा. शिरपूर फर्स्ट च्या माध्यमातून शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील गोदात्मा महाविद्यालयात 'जागर माय मराठी भाषेचा' कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त, आपली मातृभाषा असलेल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व मराठी भाषेचा वापर करण्याची घेतली प्रतिज्ञा.
जगभरात आजचा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवशी शिरपूर फर्स्ट ने शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयात या दिवसाचे महत्त्व पोहचवण्यासाठी व हा दिवस ग्रामीण भागातील महाविद्यालयात साजरा व्हावा यासाठी हा 'जागर माय मराठी भाषेचा' कार्यक्रम थाळनेर येथील गोदात्मा महाविद्यालयात साजरा करण्यात आला.
शिरपूर फर्स्टचे समन्वयक हंसराज चौधरी यांनी या दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व मराठी भाषेच्या बचावासाठी विद्यार्थ्यांनी तरुणांनी पुढे येऊन मराठी भाषा आबादीत ठेवण्यासाठी आपल्याला योगदान द्यायचे आहे, असे सांगितले. महाविद्यालयातील शिक्षकांनी कार्यक्रमात आपले मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियंत्रण व प्रतिज्ञा वाचन शिरपूर फर्स्ट चे पाच राजपूत यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी विद्यार्थी व शिरपूर फर्स्टचे सुमित गिरासे, राहुल चौधरी, चेतन राजपूत उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने