निधन वार्ता
कॉम्रेड एडवोकेट मदन परदेशी यांचे विकाराने निधन
शिरपूर - शिरपूर शहरातील ज्येष्ठ व सुप्रसिद्ध असे विविध तज्ञ सर्वसामान्य गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जिवाचे रान करणारे चळवळीतील नेते कॉम्रेड एडवोकेट मदन परदेशी यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण शिरपूर तालुका वकील संघावर शोककळा पसरली आहे. त्यांना अचानकपणे छातीत त्रास झाल्याने तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे.
शोषित वंचित सर्वहारा वर्गाचा साम्यवादी लाल तारा या मुळे हरपला आहे.धुळे जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर कामगार आदिवासी कष्टकरी दलित शोषित सर्वहरा वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढणारा धुळे जिल्ह्यातील लढवय्या नेता नियतीने आपल्यातून हीरवून नेला. शिरपूर तालुक्यातील हीसाळे या ग्रामीण भागात सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले एडवोकेट मदन परदेशी यांनी पुणे येथे कायद्याची पदवी प्राप्त करीत असताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन विद्यार्थी संघटनेतून साम्यवादाचे धडे घेऊन 1985 पासून हीसाळे गावात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करून शेतमजुरांची चळवळीला सुरुवात केली .लाल बावटा चळवळ तालुक्यात सुरू करून कॉम्रेड भीमराव मस्के वगैरे वगैरे कार्यकर्त्यांसोबत मजुर संघर्ष वाहिनी कम्युनिस्ट पक्षाचा लाल झेंडा हाती घेऊन शिरपूर तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी कष्टकरी बांधवांच्या वन जमीन जल जंगल जमिनीचा लढा उभा करून हजारो एकर जमीन कसं त् असलेल्या आदिवासी बांधवांना मिळून दलित आदिवासी भूमिहीन वंचि त शेतमजूर यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले . हीसाळे गावातील शेतमजुरांना सिलिंग कायद्याअंतर्गत जमिनी मिळून देण्यात त्यांच्या सिंहाच्या वाटा होता.
अत्यंत गोरगरीब व जनसामान्यांसाठी नाय हक्कासाठी लढा देण्याचे काम त्यांनी आपल्या जीवनात काळात संघर्षमय जीवन जगून केले होते. आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून प्रस्थापित शासनाच्या विरोधात लढा देत निवेदन आंदोलने करून जनसामान्यांच्या आवाज बुलंद करण्याच्या प्रयत्न त्यांनी नेहमीच केला होता.
आयुष्यभर संघर्ष केला संघर्ष करीत असताना अनेक केसेस अंगावर घेतल्या रस्त्यावरची लढाईलढून मोर्चा निवेदने, आंदोलन , जेलभरो आंदोलन, अशी विविध आंदोलन करून गोरगरिबांचे शासन स्तरावर मांडून आयुष्यभर सर्व हरा वर्गासाठी संघर्ष केला, मार्कस व लेनिन वादावर अतुट श्रद्धा असणारा गोरगरिबांमध्ये देव पाहणारा लढवय्या नेता , शिस्तप्रिय कार्यकर्ता, उत्तम प्रशासक, उत्तम संघटक, ॲड. मदन परदेशी यांच्या जाण्याने हरपला असून धुळे जिल्हा व शिरपूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाची चळवळीचेफार मोठी हानी झाली आहे. पक्ष व विचारावर एकनिष्ठ असलेले रोखठोक व्यक्तिमत्व असलेले मदन नाना परदेशी यांनी चळवळीच्या माध्यमातून अनेककार्यकर्ते देखील घडवले वकिली व्यवसाय करीत असताना पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक तळमळीने काम करून देण्यासाठी त्यांचा नावलौकिक होता. 2016 मध्ये प्रथम अटॅक आल्यानंतर फक्त निसर्गोपचार पद्धतीवरच श्रद्धा असल्याने आयुष्यभर मेडिसिन न घेता निसर्गोपचार पद्धतीचा अवलंब करून साधेपणाने जीवन जगले एवढेच नव्हे तर हार्ट अटॅक, कोरोना व्यसनमुक्ती यावर पुस्तकांचे देखील लिखाण केले 2025 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासाचे पुस्तक लेखनाचे काम देखील त्यांनी हाती घेतले होते आयुष्यभर मेहनत कष्ट प्रामाणिकपणा साम्य वादावर पराकोटीची निष्ठा असलेला लाल तारा आज काळाच्या पडद्याआड गेला . कम्युनिस्ट पक्षाचे माजी जिल्हा सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम करताना धुळे जिल्ह्यात पक्ष वाढण्यासाठी मदत केली सध्या ते कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सल्लागार म्हणून कार्यरत होते . ज्या ज्या वेळेस संघर्ष त्याग आणि आणि आंदोलनाचा विषय होईल त्यावेळेस एडवोकेट मदन परदेशी यांचे नाव अनिवार्यपणे पण घेतले जाईल . कॉम्रेड मदन परदेशी हा एक विचार होता जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचा विचारांचा वसा व वारसा, कार्य जिल्ह्यातील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते पुढे नेतील आज दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी धुळे येथील सेशन कोर्टात चहा कॅन्टीनमध्ये बसले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला व ते आपल्यातून निघून गेले अशा लढवय्या कॉम्रेडला जिल्हा व शिरपूर तालुकाभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अखेरचा लाल सलाम.

कॉम्रेड संतोष पाटील शिरपूर तालुका सेक्रेटरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष