दुसऱ्या मुलीसोबत फिरायचा
मारहाण करायचा तरुणीचं टोकाचं पाऊल
शेतकरी आई-वडिलांच्या पदरी आयुष्यभराचं दु:ख
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: प्रियकर प्रेयसीला सतत टाळत असल्याने याबाबत विचारणा केली असता प्रियकर तिला सतत तिच्या मित्र-मैत्रिनींसमोरच मारहाण करीत होता.
या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीने हॉस्टेलमधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना ‘आय.आय.एम.एस.
(I.I.M.S.) कॉलेज’च्या मुलींच्या डेल्टा होस्टेलमध्ये घडली होती. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
अश्वन भारद्वाज
(रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी हे ‘एम.बी.ए.(M.B.A.)’चे शिक्षण घेत होते.
त्यांचे गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपासून आरोपी प्रेयसिला सोडून दुसऱ्या मुलीसोबत फिरत होता.
याबाबत प्रेयसीने विचारणा केली असता तिला तिच्या मैत्रिणींसमोर आरोपी मारहाण करीत होता.
तिचा अपमान करीत होता.
‘तू मरून जा.
मला काही फरक पडत नाही,’
असे म्हणून प्रियकराने प्रेयसीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते.
या प्रकाराला कंटाळून प्रेयसीने हॉस्टेलमधील खोलीत छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.
म्हणून उशिराने गुन्हा दाखलमृत तरुणीचे आई - वडील शेतकरी आहेत. त्यांना आपल्या मुलीने का ?
आत्महत्या केली हे माहीत नव्हते.
काही दिवसांपूर्वी मुलीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे त्यांना कळाले.
त्यामुळे त्यांनी हिंजवडी ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.
त्या चिठ्ठीनुसार हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आरोपीचा शोध घेत असून,
लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

