चेष्टा सहन न झाल्याने लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्याला सक्तमजुरी
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : चेष्टा सहन न झाल्याने लोखंडी राॅडने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टायर पंक्चर काढणाऱ्या व्यावसायिकाला ५ वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी सुनावली.
दंडापैकी ७५ हजार रुपये जखमी बाळू पुजारी याला देण्यात यावेत, असेही मे.न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
दीपक महादेव टोमके
(वय ३४, रा. संतोषनगर, कात्रज)
असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
महेंद्र् विठ्ठल मारणे यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील
नामदेव तरगळट्टी यांनी काम पाहिले.
सहायक पोलीस निरीक्षक एस.पी.यादव यांनी या प्रकरणाचा तपास केला.
कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून
उपनिरीक्षक रमेश चौधरी,
कोर्ट अंमलदार म्हणून हवालदार एस.पी.शिंदे आणि व्ही.एस.मदने यांनी काम पाहिले.
२४ नोव्हेंबर २०१७ रोजी कात्रय बायपास रस्त्या येथे ही घटना घडली.
फिर्यादी त्यांचे मित्र अमोल ढवळे,
बालाजी कदम,
बापू मारणे,
बाळू पुजारी आणि आरोपी दीपक टोमके सर्वजण दारू पिण्यासाठी पैसे गोळा करत होते.
त्यावेळी आरोपी टोमके बरोबर वादावादी झाली. त्यानंतर चेष्टा मस्करी झाली.
मात्र, ही चेष्टा सहन झाल्याने आरोपी टोमके त्याच्या पंक्चर काढण्याच्या दुकानातून लोखंडी रॉड घेऊन आला.
फिर्यादी यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस रॉड मारून त्यांना गंभीर जखमी केले.
त्यांना वाचविण्यासाठी बाळू पुजारी मध्ये गेले. त्यावेळी
‘तु का मध्ये येतो,
तुला पण बघतो’
असे म्हणत डाव्या कपाळावर, डाव्या डोळ्यावर रॉडने मारले. त्यामध्ये पुजारी यांचा डावा डोळा निकामी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

