कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला; पोलीस दलात खळबळ प्रतिनिधी दत्ता पारेकर



कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला; पोलीस दलात खळबळ

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथूल पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी लीलाकारला पुणे पोलिसांंनी अटक केली होती. सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ याला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केली होती.

येरवडा जेलमधून प्रकृती खराब असल्याच्या कारणाने त्याला ससून हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. .फरार असलेल्या लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 8 पथके पाठवली असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहे.  .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने