कुटुंबातील व्यक्ती व मित्रांशी संवाद ठेवा मनमोकळेपणाने दिलखुलास पने व्यक्त व्हा जो माणूस बोलतो तोच आनंदी राहतो - व्याख्याते अशोक देशमुख
शहादा - घरात आपल्या सासू-सासर्यांना आई-वडिलांच्या जागी माना. सुनेला मुलीच्या जागी माना. संपूर्ण कुटुंबात प्रेम निर्माण करा व सर्वांशी आदराने वागा मनमोकळे दिलखुल्लास पणे एकमेकांशी बोला बघा कुठलेच अडथळे कुठल्या समस्या तुम्हाला जाणवणार नसल्याचे महत्वपूर्ण प्रतिपादन पुणे येथील व्याख्याते अशोक देशमुख यांनी शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफतांना केले.
शहादा येथील शिव व्याख्यानमाला समिती, शिवस्मारक बहुउद्देशीय समिती व समस्त शिवप्रेमी यांच्या वतीने शिवजयंती निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे संचालक शिवाजी भाऊसाहेब पाटील, ज्येष्ठ नागरीक लक्ष्मण कदम, शाम जाधव, डॉ.किशोर पाटील, दिलीप गांगुर्डे, अनिल भामरे, ज्ञानेश्वर चौधरी, अरविंद कुवर, किशोर मोरे, भरत अग्रवाल, सुनील बोरसे, समीर जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
आनंददायी जीवनाचे राजमार्ग हा विषय समजवताना श्री देशमुख यांनी लोकांशी हसत खेळत संवाद साधला. खरंतर व्याख्यान म्हटले म्हणजे हा श्रोत्यांशी संवाद असतो पण तो एका जागेवर आज मात्र अशोक देशमुख यांनी थेट स्टेजवरून लोकांमध्ये मिसळत लोकांशी हसत खेळत चिमटे घेत जीवनाचे आनंददायी मार्ग कसे असतात याची खरी अनुभूती दिली. माणसाने दिल खुलास बोलला पाहिजे एकमेकांशी संवाद साधला पाहिजे एकमेकांशी संवाद असेल तर तो माणूस टेन्शन पासून दूर जातो म्हणून प्रत्येकाने मन मोकळेपणाने बोलले पाहिजे.
आज समाजामध्ये वावरत असताना आपण पाहत असतो की प्रत्येक लहान बाळापासून तर थेट ९० पर्यंतच्या माणसाच्या चेहऱ्यावरती कुठल्या ना कुठल्या समस्यांनी तो ग्रस्त असल्याचे जाणवतं इतका त्रस्त होतो. की कधीकधी तो आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचत असतो आणि असा विचार जेव्हा त्याच्या मनात येत आहे. असे आपल्याला जाणवते त्यावेळेस त्याला फक्त दूर करण्यासाठी अडीच मिनिटांचा कालावधी हा पुरेसा असतो. त्या अडीच मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण जर त्याच्या विचारांमध्ये परिवर्तन केलं तर तो त्या कृती पासून दूर होतो.
आनंददायी जीवनाचे मार्ग सांगत असताना त्यांनी सांगितले आपल्या घरच्यांशी, आपल्या मित्रांशी, कामाच्या ठिकाणी रस्त्यावरती बोलत रहा. घरामध्ये वावरत असताना एकमेकांशी संवाद ठेवा. पत्नीने ही घरामध्ये नीटनेटके रहावे. आणि पतीने सुद्धा बाहेरून नीटनेटकेच यावे हाच आनंददायी जीवनाचा सर्वोत्तम मार्ग होय आणि एकच आशा पूर्ण सभामंडपात पिकला. योग करा, चालत राहा, आपल्या परिवारासोबत सहलीला जा सहलीला जात असताना मोबाईलचा फक्त इनकमिंग ठेवा. आउटगोईग बंद ठेवा जेणेकरून तुम्ही फक्त तुमच्या व्यक्तींसाठीच आहात याचा भास त्यांना होऊ द्या. हेच आनंददायी जीवनाचे मार्ग असल्याचे त्यांनी आपल्या विनोदी शैलीतून सांगितले.
या कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुर्भुज शिंदे यांनी तर आभार एन डी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिवप्रेमीनी परिश्रम घेतले.
