मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस निमित्ताने अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप
शिरपूर प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस निमित्ताने शिरपूर शहरात शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षात च्या कार्यकर्त्यांनी अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह शिरपूर येथे शहरातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून मुख्यमंत्र्यांचे वाढदिवस साजरा केला. यावेळेस अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्यदायी असे योजना व उपक्रम राबवून सर्वसामान्यांची सेवा करत असतात. मग कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या वाढदिवस अनोखा पद्धतीने साजरा करण्याच्या निर्धार करून त्यांच्या वाढदिवस निमित्ताने हा उपक्रम राबवला आहे. या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले यांचे मार्गदर्शन लाभले. शिरपूर शहरातील शिवसेनेचे व तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेना युवा सेना वैद्यकीय कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी तालुकाप्रमुख दीपक जमादार,
तालुकाप्रमुख कन्हैया चौधरी ,शहर प्रमुख मनोज धनगर, युवा सेना शहराधिकारी दिनेश गुरव , तालुका संघटक विजय चव्हाण,शहर संघटक प्रवीण धनगर ,उपशहर प्रमुख,नारायण माळी
तालुका अध्यक्ष संजय पाटील,प्रकाश राजपूत,
चेतन भोई, सिद्धार्थ सर,कुणाल शेटे,शहर समन्वयक गणेश वाडीले ,संजू पाटील,शुभम गवळी,राहुल पाटील,गौरव पाटील,कल्पेश गवळी,
अमोल राजपूत,किरण राजपूत,आकाश राजपूत,
गणेश राजपूत,संदीप पाटील,नक्षत्र पाटील,भूषण कोळी,हिमांशू जैन,अविनाश माळी,अविनाश पाटील , विजय गुरव असे शिवसैनिक उपस्थित होते.
