नंदूरबार लोकसभा मतदारसंघ व्यसन मुक्त करणार- सुशिलकुमार पावरा* *बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक २* *गणोर बिरसा फायटर्स महिला गाव शाखेने दारू बंदी करून निर्माण केला आदर्श*



*नंदूरबार लोकसभा मतदारसंघ व्यसन मुक्त करणार- सुशिलकुमार पावरा* 

*बिरसा फायटर्सचे ध्येय क्रमांक २*

*गणोर बिरसा फायटर्स महिला गाव शाखेने दारू बंदी करून निर्माण केला आदर्श* 

नंदूरबार: नंदूरबार लोकसभा मतदारसंघ व्यसनमुक्त करणार.हे आमचे दुसरे ध्येय आहे.जोपर्यंत नंदूरबार लोकसभा मतदारसंघ व्यसनमुक्त होत नाही, तोपर्यंत माझ्या या मतदारसंघाचा विकास होणार नाही,प्रगती होणार नाही.
नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात व्यसनाचे प्रमाण जास्त आहे.जिल्ह्यात व्यसनाचे प्रमाण वाढायला जबाबदार येथील एकंदरीत वातावरण आहे आणि येथील पोलीस प्रशासन सुद्धा तेवढेच याला  जबाबदार आहे.
                      अनेक संसार व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेत. दारू विकणारे व दारू पिणारे दोन्ही मला आवडत नाहीत. दारू पिऊन मुलगाच आपल्या स्वतःच्या आई वडीलांना मारतो ,बायका ,पोरांना मारतो,एक विचित्र चित्र बघायला मिळते. शिकलेले तरूण या दारूच्या आहारी जास्त जातात. त्यांचे भविष्य खराब होते. दारू विकणे हा काही लोकांचा प्रमुख व्यवसाय बनला आहे. त्यांच्यामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त होत आहेत, याचा दारू विकणारे विचार करत नाहीत. 
                     गुटखा तंबाखू बिडी पिणा-यांची संख्या  सुद्धा जिल्ह्य़ात अधिक आहेत. हे गुटखा खाणारे बसस्टॅन्ड, दवाखाना सारख्या सार्वजनिक ठिकाणी थुंकतात,आपल्या मुखातील पिचकारींनी रंगरंगोटी करून ठेवतात.त्यामुळे अस्वच्छता निर्माण होते.आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.गुटखा वर सध्या पोलीस प्रशासन कारवाई करत आहे.तरी गुटखा  हा प्रकार कायमचाच बंद झाला पाहिजे.जुगार,सट्टा, गांजा असेही काही अवैध धंदे जिल्ह्य़ात बघायला मिळतात. हे अवैध धंदे आम्ही बंद करू.
                  आमच्या  बिरसा फायटर्स महिला गाव शाखा गणोर  यांनी गावात दारू बंदी करून एक चांगला आदर्श निर्माण केला.त्यांनी गावात दारू विकणा-यांनाच हाणून दारू बंदी केली आहे. गावात दारू बंदी करण्यासाठी महिलांनी पुढे यावे.तुमच्या गावात दारूबंदी करायची असल्यास बिरसा फायटर्स महिलांची एक टिम अवश्य बनवा व त्याच्या माध्यमातून दारू बंदी करा.
                     तुम्हाला नंदूरबार लोकसभाश्रॆत्र व्यसनमुक्त बनवायचे असेल,नंदूरबार लोकसभाश्रॆत्र व्यसनमुक्त झालेला बघायचे असेल तर मला व माझ्या बिरसा फायटर्स टिमला सपोर्ट करा.

      रोकनी होगी ये बर्बादी
     बदलना होगा अब ये जमाना
    आओ मिलकर कदम बढाये 
    नशामुक्त भारत बनाये,नशामुक्त नंदूरबार और धुले जिला बनाये l

  नयी सोच ,नया जोश , नया जुनून, 
बिरसा फायटर्स बिरसा फायटर्स
         अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने