शिंदखेडा - जिनिंग कंपनीवर कोणतेही कारवाई करू नये यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन



शिंदखेडा - जिनिंग कंपनीवर कोणतेही कारवाई करू नये यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन

शिंदखेडा  (वा)  तालुक्यातील परसामळ शिंदखेडा रेल्वे स्टेशन येथे असलेल्या जिनिंग पासून कुठलेही प्रदूषण होत नसून  शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या  जिनिंग वर कुठलीही कारवाई करू नये अशी मागणी  परसामळ येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, प्रदूषण महामंडळ तहसीलदार यांना  निवेदनाद्वारे केली आली आहे
  निवेदनात म्हटले आहे की  परसामळ ग्रामपंचायत  हद्दीतील  शिंदखेडा रेल्वे स्टेशन येथे   वर्धमान कॉटेक्स  हा जिनिंग कारखाना आहे येथे कापसावर प्रक्रिया केली जाते परिसरात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते परंतु प्रक्रिया उद्योगाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नव्हता होता मात्र या ठिकाणी जिनिंग सुरू झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी हक्काचे ठिकाण  असल्याने  
त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळत आहे मात्र ज्यांचा शेती व्यवसायासाठी काही संबंध नसलेल्या स्टेशन कॉलनी जवळील काही नागरिकांनी जिनिंग बाबत खोट्या तक्रारी देण्यात आले आहेत  सदर जिनिंग शेती पूरक असून आमच्या शेतकऱ्याच्या हिताची आहे तसेच जिनिंग पासून कोणतेही प्रकारचे प्रदूषण होत नाही  शेतकऱ्याचा हिताचा विचार करून या बाबत कोणतीही कार्यवाही करू नये. अशी मागणी परसामळ  येथील शेतकरी दिलीप गिरासे,दिनेश पवार, केदार गिरासे, महेंद्र गिरासे ,संदीप गिरासे ,हिंमत पाटील ,दीपक पाटील ,सुनील कोळी ,प्रकाश कोळी, यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे 400 ते 500 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले आहे


प्रतिक्रिया दिनेश पवार शेतकरी



आम्हाला पहिले कापूस विक्रीसाठी मध्य प्रदेश अथवा गुजरात मध्ये कापूस घेऊन जावा लागत होता तरीदेखील व्यवस्थित दर मिळत न होता आता या ठिकाणी जिनिंग सुरू झाल्याने व्यवस्थित दर मिळत आहे  मात्र काही नागरिक ज्यांचा शेतीशी काही संबंध नाही ते जिनिंग बद्दल खोट्या तक्रारी देत आहेत आम्ही येथील रहिवासी असून आम्हाला या जिनिंगचा कुठलाही त्रास होत नाही तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या जिनिंग कारखान्यावर संबंधित प्रशासनाने शहानिशा केल्याशिवाय कुठलीहि कारवाई करू नये अन्यथा आम्ही परिसरातील सर्व शेतकरी एकत्र येत याचा प्रखरपणे विरोध करू

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने