शहादा -स्वराज्य सप्ताहा'चे आयोजन



शहादा -स्वराज्य सप्ताहा'चे आयोजन

शहादा -युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं 'रयतेचं राज्य' हाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आजवरच्या वाटचालीचा गाभा राहिलाय. छत्रपती शिवरायांचे विचार आणि उत्तुंग कार्य हीच आपली प्रेरणा आहे. म्हणूनच यंदा शिवजयंती निमित्ताने दि. १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान पक्षातर्फे 'स्वराज्य सप्ताहा'चे आयोजन करण्यात आलंय.
आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा उपाध्यक्ष श्री मोहन दादा शेवाळे यांच्या उपस्थितीत शहादा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची साफसफाई करून  अभिवादन केले यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष  सिताराम पावरा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री माधवराव पाटील शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे महिला शहराध्यक्ष  नगमा मेमन राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव  संतोष पराडके  सामाजिक न्याय जिल्हा  उपाध्यक्ष गोविंदभाऊ शेवाळे, शहर उपाध्यक्ष चुडामण आण्णा, गणेश राजे,सुरेश पावरा,सोमनाथ न्हावळे,  जिल्हा संघटक नवनीत ठाकरे  ओबीसी प्रदेश सचिव रवींद्र पाटील तालुका उपाध्यक्ष  प्रवीण पाटील युवक सरचिटणीस आनंदा पानपाटील सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष  हिरालाल जगदेव आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने