नंगानाच करणाऱ्या प्रवीण कोळीला अटक करा : बिरसा फायटर्सचे निवेदन*




*नंगानाच करणाऱ्या प्रवीण कोळीला अटक करा : बिरसा फायटर्सचे निवेदन*

शिरपूर प्रतिनिधी:

तालुक्यातील पिंप्री येथे पोट भरण्यासाठी आलेल्या आदिवासी महिलेसमोर स्वत:चे कपडे काढून विवस्र अवस्थेत नंगानाच करणाऱ्या प्रवीण कोळीवर अनुसूचित जाति व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 अन्वये व विनयभंगाच्या कायदा कलम 354-अ व 354-ब नुसार गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर्सच्या वतीने डीवायएसपी, शिरपूर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन म्हटले आहे की, पिंप्री येथील महेंद्र सिसोदिया यांच्या शेतात सालदारकी करण्यासाठी मध्यप्रदेश राज्यातील मालवण ता. वरला येथील कुटुंब आले होते. दि. 19 रोजी महिला घरात एकटी असल्याच फायदा घेत प्रविण श्रावण कोळी याने स्वतः च्या अंगावरील कपडे काढून शारिरीक सुखाची मागणी करू लागला. ती महिला झोपडीत इकडेतिकडे पडू लागली तर त्याने तीची साडी पकडून महिलेला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करून सदर महिलेच्या अंगावरील कपडे फाडले.
सदर महिला जोरजोराने आरोड्या मारल्यामुळे तेथे गावातील नागरिक जमा होऊ लागल्याने प्रविण कोळी याने तेथून पळ काढला.

सदर प्रकरणी महिलेचा शारिरीक सुखासाठी मागणी व विनयभंग करणाऱ्या प्रविण श्रावण कोळी यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 व विनयभंगाचा कायदा कलम 354-अ व कलम 354-ब अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक अन्यथा येत्या काही दिवसांत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिरपूर समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

निवेदन देताना यांची उपस्थिती
मनोज पावरा राज्य अध्यक्ष, विलास पावरा, नाशिक विभाग अध्यक्ष, भोंग्या पावरा, भटु कोकणी, विकास कोकणी, ज्ञानेश्वर भील,भटू कोकणी, विकी कोकणी, शिवाजी पावरा, खंडू कोकणी, अजय भरसट आदी आदिवासी बांधव उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने