श्यामची आई हि कांदबरी बालमनावर संस्कार घडविते अ. भा. मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथील बाल कलानंद साहित्य मेळाव्यात शालेय विद्यार्थीनी तनुश्री सोनार हिचे प्रतिपादन.




श्यामची आई  हि  कांदबरी  बालमनावर संस्कार घडविते 

अ. भा. मराठी साहित्य संमेलन अमळनेर  येथील  बाल कलानंद साहित्य मेळाव्यात  शालेय विद्यार्थीनी तनुश्री सोनार  हिचे  प्रतिपादन.


 ( प्रतिनिधी शिरपूर ) -   अ.भा मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथील कलानंद बाल मेळाव्यात बोलताना सावित्री ताई रंधे कन्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी तनुश्री सोनार हिने श्याम ची आई या कादंबरीवर आधारित मुकी फुले रात्र ३ री हि  कथा कथन करतानां सांगितले की ज्याप्रमाणे अर्धवट फुललेली फुले देवाला अर्पण करणं योग्य नाही तशी अर्धवट केलेलं काम देखील देवाला प्रिय नसते , हे साने गुरुजी उर्फ श्याम ची आई या कथेमालिकेतील आई यशोदा यांची शिकवण आहे , हि शिकवण प्रत्येक मुंलानी आत्मसात केली पाहिजे असे सांगितले. पुढे सांगताना आज साने गुरुजींच्या मनावर संस्कार घडविणारी आई प्रत्येक घरात असेल तर नक्की साने गुरुजी सारखे संस्कार मुलांवर घडेल एवढेच नव्हे तर साने गुरुजींच्या कथेवर आधारित श्याम ची आई हि कादंबरी मुलांवर संस्कार घडवायला भाग पाडते असे हि प्रतिप्रादन साने गुरुजी साहित्य नगरी येथील बाल साहित्य मेळाव्यात करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर बालसाहित्यकार बालमेळावा समन्वयक एकनाथ आव्हाड, माया धुप्पड, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष्ाा  प्रा. डॉ. उषा तांबे, बालअध्यक्ष्ा शुभम सतीश देशमुख (चाळीसगाव), उद्घाटक पियुषा जाधव (जळगाव), स्वागताध्यक्ष्ा दीक्षा राजरत्न सरदार, साने गुरुजींच्या पुतनी सुधाताई साने, मदत व पुर्नवसनमंत्री अनिल पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेंहदळे, कार्याध्यक्ष्ा प्रा. डॉ. अविनाश जोशी आदी उपस्थित होते. 
कलाआनंद बा मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात 97 व्या साहित्य संमेलनानिमित्ताने साने गुरुजी विद्यालयाच्या  97 विद्यार्थ्यांनी ‌‘खरा तो एकच धर्म' ही पूज्य साने गुरुजी यांची कविता सादर केली. 
बालमेळाव्याचे मुख्य समन्वयक एकनाथ आव्हाड प्रास्ताविकात म्हणाले, की हा बालमेळावा मुलामुलांना जोडण्याचे काम करेल, मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढवेल व विविध बालसाहित्य प्रकारांचे दर्शन घडवेल.
स्वागताध्यक्ष दीक्षा सरदार हिने आपल्या भाषणात बालमेळाव्यातील कलाकारातूनच उद्याचे यशस्वी कलाकार निर्माण होणार आहेत, असे मत व्यक्त केले. आजच्या विद्यार्थ्यांनी या वयात साहित्यिकांची व साहित्याची ओळख झाली तर भविष्यातील सुजाण नागरिक तयार होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. 
या प्रसंगी  ज्येष्ठ साहित्यिका व मेळावा प्रमुख प्रा . वसुंधरा लांडगे मॅडम, भैय्या साहेब मगर संदिप सर स्नेहा एकतारे मॅडम व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले याबद्दल सावित्री ताई रंधे कन्या विद्यालयातील विद्यमान प्राचार्या सारिका ताई रंधे यांनी तनुश्री सोनार चे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या . याव्यतिरिक्त सारिका ततार प्राचार्य डॉ व्हि व्ही रंधे इंग्लिश स्कूल यांनी हि शुभेच्छा दिल्या याव्यतिरिक्त साहित्यिक, सांस्कृतिक व राजकीय, सामाजिक व नाट्य व चित्रपट सृष्टीतील मान्यवर यांनी हि शुभेच्छा दिल्या. असे मनोगत संत साहित्यक व लेखक सुनील सोनार यांनी व्यक्त केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने