प्रतिनिधी शहादा सुमित गिरासे
कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार जिल्हा संघटनेतर्फे यांच्या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बारावीचे उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार देणार असल्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले
बाबत सविस्तर वृत्त असे की कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आपण चर्चा करीत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाने पूर्वी दिलेल्या इशारा पत्रानुसार यावर्षीच्या बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक आता बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणार नाही असे निवेदनात म्हटले आहे
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या समस्या बाबत चर्चा करून आपण गेल्या वर्षी मार्च 2023 रोजी काही मागण्या मान्य करीत लेखी आश्वासन दिल्यानंतर महासंघाने बारावीचे उत्तर पत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला होता त्यानंतर मागण्यांमधील 1298 वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी सदर पदावर कार्यरत केवळ 283 शिक्षकांच्या समावेशनाच्या आदेश काढला व राज्यात काही शिक्षकांचे समायोजन करण्यात आले परंतु अनेक शिक्षकांचे समावेशनातून झालेले नाही अनेक शिक्षकाबाबत त्रुटीची पूर्तता होऊनही त्यांचे समावेशनाचे आदेश दिलेले नाहीत तसेच यापैकी काही शिक्षकाचे वेतन अद्याप सुरू झालेले नाही असे निवेदनात म्हटले आहे
शिक्षकांना वेतन श्रेणी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे इत्यादी मान्य मागण्यांचे आदेश निघालेले आहेत उर्वरित मागण्याबाबत हे उन्हाळी अधिवेशन सांगतात चर्चा केली जाईल असे सांगितले होते अद्यापही आपण चर्चा केलेली नाही. नागपूर अधिवेशनात महासंघाने धरणे आंदोलन केल्यानंतर निवेदन स्वीकारताना आपण अधिवेशन संपल्यानंतर लगेचच बैठक घेऊ असे आश्वासन दिले परंतु त्याची पूर्तता केली नाही त्यामुळे नाईलाजाने पूर्वसूचनेनुसार महासंघ बहिष्कार आंदोलन करीत आहे काही मागण्या पुढील प्रमाणे एक नोव्हेंबर 2005 पूर्वी अर्धवेळ विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेच्या तातडीने लाभ द्यावा २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी दहावी वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी निवड श्रेणीची वीस टक्के हॉट रद्द करावी सर्व वाढीव पदांना मंजुरी द्यावी आयटी विषय शिक्षकांना वेतन श्रेणी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात येत आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक एस एन पाटील जिल्हा सचिव प्राध्यापक गणेश सोनवणे उपाध्यक्ष प्रा आसिफ शहा जिल्हा सहसचिव प्राध्यापक भरत चव्हाण प्रसिद्धीप्रमुख प्राध्यापिका सुनीता कुवर शहादा तालुकाध्यक्ष विजय डोळे आयटी विषयाचे सचिव विकास पाटील जिल्हा कार्यकारणी सदस्य प्राध्यापक वायची पाटील प्राध्यापिका गिरासे एस एम सह प्राध्यापक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
