तरूणीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या- बिरसा फायटर्स प्रतिनिधी, शिरपूर




तरूणीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या- बिरसा फायटर्स

प्रतिनिधी, शिरपूर
             धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील वीरदेल येथे 14 वर्षीय आदिवासी मुलीचा गळा आवळून खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. त्या मुलीच्या मारेकऱ्यांना अटक करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशी देण्याची मागणी बिरसा फायटर्सच्या वतीने शहर पोलीस ठाणे निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. 
          निरीक्षक शहर पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे सदर निंदनीय घटनेचा बिरसा फायटर्स संघटनेच्या वतीने निषेध केला असून, मुलीचा खून होवून 6-7 दिवस ऊलटूनही अद्यापही मारेकरी सापडले नाहीत. सदर घटनेतील मारेकऱ्यांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करावी आणि सदर खून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी शहर पोलीस ठाणे निरीक्षक के. के. पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक धुळे व पोलीस निरीक्षक शिंदखेडा पोलीस ठाणे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष मनोज पावरा, जिल्हा संघटक काकड्या पावरा, शिवाजी पावरा, चुनीलाल पावरा, शुभम पावरा, बादल पावरा, किरण पावरा आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने