थाळनेरला ८६ विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप
थाळनेर ( प्रतिनिधी)
शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित श्रीमती. द.त्ता. पवार कनिष्ठ महाविद्यालय व संत गाडगे महाराज विद्यालयातील ८६ विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांतभाऊ रंधे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच सौ. मेघा संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद शिरसाठ, शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी, कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष आनंदराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य विलास सोनवणे, अनिल मराठे, मोतीलाल भील, सो.मंगलाबाई कोळी, सो भारती सुनील निळे, केंद्रप्रमुख रमेश कोळी, सामाजिक कार्यकर्ते भटू शिरसाठ, संदीप पाटील, होमगार्ड समाजसेवक निंबा पाटील,पत्रकार मधुकर शिरसाठ आदी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार विद्यालयामार्फत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य शामकांत ठाकरे यांनी केले. मानव विकास मिशन अंतर्गत विद्यालयातील इयत्ता ८वी ते १२वी विद्यार्थिनींना ८६ सायकली मिळाल्या आहेत. या सायकलचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती सौदामिनी इंदासे व एन. सी. जडिये यांनी केले.
