इंदापूर तालुक्यातील लुमेवाडीत आज आमदार दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते ८ कोटी २० लाख निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे:लुमेवाडी (ता. इंदापूर) येथे माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते आज रविवार (दि.११) ८ कोटी २० लाख निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे असतील तर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जि.प सदस्य श्रीमंत ढोले, माजी जि.प सदस्य प्रताप पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, ज्येष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, पिंपरी बु. चे माजी सरपंच श्रीकांत बोडके, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.याठिकाणी सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
