शिरपूर शहर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई
सुगंधी तंबाखूचा 90 लाखांच्या मुद्देमाल जप्त
शिरपूर शहर पोलिसांची सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्री प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू ची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत त्यातून 90 लाख 37 हजार 600 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे. विशेष म्हणजे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक के के पाटील यांची ही पहिल्याच आठवड्यात तिसरी कारवाई आहे. या कारवाईत एक आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करत मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत दिनांक 4 फेब्रुवारी रोजी अठरा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक शिरपूर यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली होती की आमोदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे गावाजवळील शिरपूर फाटा येथे इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर मालट्रक क्र.एम.एच.१८/बी.ए.०१३६ उभा असुन त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस,विक्रीस प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थ माल भरलेला आहे. त्यानुसार एक पद्धत तयार करून सापळा रचून कारवाई केली असता सदरच्या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुगंधी तंबाखूचा माल मिळून आला. या प्रकरणात आरोपी निसार इसाक सैयद वय ३४ राहणार रामसिंग नगर, शिरपूर जिल्हा धुळे अटक करण्यात आली असून या कारवाईत साठ लाख 37 हजार 600 रुपयांच्या मुद्देमाल व तीस लाख रुपयांचे वाहन असा 90 लाख 37 हजार 600 रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे
सदरचा कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, तसच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, हेमंत खैरनार तसेच डी.बी. पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल ललीत पाटील,रविंद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भटु साळके, सचिन वाघ, मनोज महाजन, आरीफ तडवी, रविंद्र महाले, मोहन सुर्यवंशी, गोपाल माळी, विजय पाटील तसेच प्रमोद ईशी, होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद बारी अशांनी मिळून केली आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशन कडून होणाऱ्या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर गुटखा पान मसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांवर बचत बसला असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या सर्व धडक कारवायांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.


