**दोंडाईचा शहरातील 32 दुचाकी स्वारांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई- दोंडाईचा पोलीस स्टेशनची कारवाई**
दोडाईचा (अख्तर शाह)
दि.26/02/2024 रोजी दोंडाईचा शहरातील
1) दोंडाईचा बस स्टैंड तसेच
2) छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील चौकात दोंडाईचा पोलीस स्टेशनकडुन नाकाबंदीचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी ट्रीपल सीट असणारे वाहनधारक, विनापरवाना वाहन चालवणारे वाहनधारक तसेच विना नंबरप्लेट असणारे वाहनधारक व सार्वजनिक ठिकाणी वाहने पार्क करुन रहदारीस अडथळा निर्माण करणे अशा वाहनधारकांवर मोटार वाहन अधिनीयम 1988 अंतर्गत विविध कलमांन्वये एकुण 32 वाहनांवर कारवाई करण्यात आली असुन त्यांचेकडुन एकुन 19,700/- दंडाचे ऑनलाईन चलन आकारण्यात आले आहे. सदर कारवाई अंतर्गत एकुन 17 वाहन हे दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे हे पुढील कारवाई कामी आणले आहेत. सदर कारवाईवेळी कर्णकर्कश आवाजाच्या तीन बुलेट ह्या पोलीस स्टेशनला आणुन त्यांचे सायलन्सर काढून ते जप्त करण्यात आलेले असुन सदर वाहनमालकांना यापुढे असे सायलन्सर न वापरण्याबाबत ताकीद देण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे सो, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रभारी स.पो. नि. निलेश मोरे, पोउपनि/ चांगदेव हंडाळ, पोउपनि हेमंत राऊत, पोउपनि/ नकुल कुमावत, पोहेकॉ सुनिल महाजन, प्रशांत कुलकर्णी, पो.ना. नरेंद्र शिरसाठ, नरेश मंगळे, पोकों/हिरालाल सुर्यवंशी, निर्मल वंजारी, प्रकाश पावरा तसेच दोंडाईचा पोलीस स्टेशनचे होमगार्ड अशांनी केली असुन नागरीकांनी वाहतुक नियमांचे पालन करुन वाहने चालविणे बाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश मोरे यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.
सहा. पोलीस निरीक्षक दोंडाईचा .
