शहादा शहरातील कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची दादागिरी....
कापूस कमी दरात का खरेदी करतात असा जाब विचारताच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला मारहाण......
बाजारभावापेक्षा 270 रुपये कमी किमतीने खरेदी केला जातोय कापूस....
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची दादागिरी सुरू असल्याचा आरोप कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.
शहादा कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची मनमानी पद्धतीने कापसाची मनमानी पद्धतीने खरेदी केली जात असून बाजारभावापेक्षा 270 रुपये कमीने कापसाची खरेदी केली जात आहे कापसाचा बाजार भाव 7 हजार 70 रुपये असताना देखील शहादा कापूस खरेदी केंद्रावर 6 हजार 800 रुपयांनी कापसाची खरेदी केली जात या सोबतच कट्टीच्या नावाखाली प्रतिक्विंटल पाच दहा किलो कापसाची कपात केली जात आहे यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे असा आरोप कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.
या मनमानी कारभाराच्या जाब विचारण्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांकडे गेले असता व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे.. एकूणच हे कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची दादागिरी सुरू आहे असे चित्र दिसत असून याबाबत तात्काळ प्रशासनाने दखल घेत मुजोर व्यापाऱ्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या व्यापारावर कारवाई करण्याची मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
