हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज गलांडवाडी नं. 2 येथे रु. 6 कोटी 82 लाखांची उद्घाटने व भूमिपूजनांचे कार्यक्रम •हर्षवर्धन पाटील यांचा नागरी सत्कार होणार प्रतिनिधी दत्ता पारेकर



हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आज गलांडवाडी नं. 2 येथे रु. 6 कोटी 82 लाखांची उद्घाटने व भूमिपूजनांचे कार्यक्रम


•हर्षवर्धन पाटील यांचा नागरी सत्कार होणार 

प्रतिनिधी दत्ता पारेकर 

             पुणे:भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गलांडवाडी नं. 2 येथे एकूण रु. 6 कोटी 82 लाखाच्या विविध विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजन कार्यक्रमांचे तसेच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या जाहीर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन आज बुधवार दि. 21 रोजी सायंकाळी 6 वा.करण्यात आले आहे.
               डीपीडीसी जन सुविधा योजनेअंतर्गत, 25 /15 योजनेअंतर्गत विविध विकासकामांची भूमिपूजने तसेच नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन त्याचप्रमाणे अनेक कामांची उद्घाटने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार असणार आहेत. तसेच तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तरी आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सौ.आशा गलांडे, उपसरपंच मोहन कदम, ग्रा.पं. सदस्य व गलांडवाडी नं. 2 च्या ग्रामस्थांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने