शहादा पोलिसांची दबंग कारवाई 14 लाखांसह मुद्देमाल जप्त*



*शहादा पोलिसांची दबंग कारवाई 14 लाखांसह मुद्देमाल जप्त* 

   शहादा पोलिसांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित सुपारी अवैधरित्या विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई करीत सुगंधी सुपारी व ट्रक सह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई काल दिनांक दोन रोजी रात्री सव्वा सात वाजता शहादा दोंडाईचा रस्त्यावर करण्यात आली या घटनेत ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले आहे
     पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार


 महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तंबाखू मिश्रित गुटखा व सुगंधित सुपारी यांची एका मोठ्या ट्रक मधून अवैधरित्या विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार शहादा दोंडाईचा रस्त्यावर रस्त्या नजीक असलेल्या हॉटेल खोडियार जवळ पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली त्यात ट्रक क्र. सी.जी. 04 - पी.डी. - 5935 उभा असलेला दिसला पोलिसांनी या ट्रकची तपासणी केली असता त्यात  सुगंधित सुपारीने भरलेले सुमारे 4 लाख 10 हजार रुपये किमतीचे पाउच मोठ्या प्रमाणात गोण्यांमध्ये भरलेले आढळून आले पोलिसांनी 10 लाखाच्या ट्रकसह 14 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पोहेकॉ.  जितेंद्र  सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक जय भानसिंह राम सुमिरन सिंह  रा. आमलाई  ता.  शहाडोल जी. सिधी ( मध्यप्रदेश) याच्या विरोधात भादवी. कलम 188, 272, 273, 328 सह अन्नसुरक्षा मानके अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून ट्रकचालकास अटक करण्यात आली आहे तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने