महिलेची पोत ओढणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 03 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये 25,000/- दंड ...!
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
नंदुरबार शहरातील माणिक चौक येथे दि. 17/05/2013 रोजी फिर्यादी शोभाबाई सुभाष कोकणी वय-32 रा.सुरज कसरी नगर नंदुरबार हया त्यांची आई विमलबाई चौरे व मुलगी समृध्दी कोकणी असे रिक्षाने आले होते. सायंकाळी 05.30 वाजेचे सुमारास माणिक चौकात पायी चालत असतांना आरोपी विजय करण पाडवी हा फिर्यादी शोभाबाई कोकणी यांचे मागून आला व त्याने त्यांचे गळयातील 15 ग्रॅम वजन असलेली सोन्याची पोत बळजबरीने ओढली होती. तेव्हा फिर्यादी शोभाबाई कोकणी यांनी आरोपी यास प्रतिकार करुन त्याचा शर्ट पकडला होता परंतु त्याने शोभाबाई यांना झटका देऊन शास्त्री मार्केटकडे पळ काढला होता. तेव्हा शोभाबाई यांनी आरडाओरड करुन आरोपीच्या मागे धावल्या होत्या. थोडया वेळाने आरोपी हा जुन्या कोर्टाजवळ लक्ष्मी हॉटेल जवळ चालत असतांना शोभाबाई यांनी ओळखले व लोकांना बोलावून आरोपी यास पकडले होते. तेव्हा जमलेल्या जमावाने त्याची विचारपूस केली असता तो त्याचे नाव सांगत नव्हता. त्याच वेळेस घटनास्थळी पोलीस गाडी आली व त्यास पोलीसांनी पोलीस ठाणेत हजर केले होते. पोलीसांनी त्यास पोलीस ठाणेत त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विजय करण पाडवी रा.वेलदा ता.निझर असे सांगितले होते. त्याअन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाणेत गु.र.नं. 120/2013 भा.द.वि. 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. रमेश पाटील यांनी सदरचा गुन्हयाचा तपास पोउपनि- पी.टी.माळी यांचेकडेस दिला. पोउपनि- पी.टी.माळी व त्यांचे सहकारी पोलीस यांनी सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विजय करण पाडवी रा.वेलदा ता.निझर याचे विरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते.
सदर खटल्याची सुनावणी मा. श्रीमती प्रियंका काजळे मॅडम, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांचे समक्ष झाली आहे. सरकारी पक्षाचे वतीने सहा. सरकारी अभियोक्ता ॲड. श्री.कदमबांडे यांनी काम पाहीले आहे. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच व इतर साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने मा. काजळे मॅडम, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांनी आरोपीतास भा.द.वि.क.-392 अन्वये दोषी ठरवत 3 वर्ष सश्रम कारावास व रुपये 25,000/- दंडाची शिक्षा ठोठावली आहे. खटल्याचे सुनावणी दरम्यान पोसई/राहुल भदाणे, पैरवी अधिकारी तसेच पैरवी अंमलदार पोहेकॉ/183 गणेश धनगर व पोहेकॉ/643 मनोज साळुंखे यांनी कामकाज पाहीले आहे. सदर गुन्हयातील तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी अभियोक्ता यांचे मा.पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस व मा.अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.
