थाळनेरला ग्रामसभेत OBC घरकुल यादी व बस स्थानकावरील अतिक्रमण वरून गाजली
थाळनेर (प्रतिनिधी)
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील ग्रामसभेत मोदी आवास योजनेतून ओबीसी साठी झालेल्या यादी बाबत व बस स्थानकावरील अतिक्रमणासह इतर विषयांवर गाजली.
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच सो मेघा संदीप पाटील होते. ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे यांनी मागील सभेचे प्रोसोडिंग वाचून दाखवले. मोदी आवास योजनेतील इतर मागास प्रवर्ग(OBC)जी लाभार्थी यादी बनली आहे त्यावर डोंगर कोळी यांनी आक्षेप घेतला. यावरून ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला. या यादीस तात्पुरती स्थगिती देण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी पंचायत विकास निर्देशांक, MREGS अंतर्गत सामाजिक अंकसेशन बाबत माहिती देण्यात आली. नागरिकांनी जमादार पाडा मागील कोळीवाड्यातील अपूर्ण काँक्रिटीकरण, कोळीवाडा व धनगर गल्लीस जोडणारा रस्त्याचे दुरुस्ती करणे, जमादारपाडा भागात अंगणवाडी बांधकाम करणे, महर्षी वाल्मीक नगर हाउसिंग सोसायटी भागात अंगणवाडीस जागा उपलब्ध करणे, गावात सुरू असलेला कामाचे फलक लावणे, दिव्यांगांना ५% निधी उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत जागेतील अतिक्रमण काढणे, शॉपिंग कॉम्प्लेक्स गरजू व्यक्तींना व पोट भाडेकरूना देणे, शेतकऱ्यांना गळ काढण्यास परवानगी देणे, आठवडे बाजारातील अतिक्रमण काढून संडासाची साफसफाई करणे, दामशेरपाडा ते बैठक हॉल इथपर्यंत सोलर लॅम्प लावणे, माळीवाडा भागात मुतारी बांधणे, नवीन NA झालेल्या शेतीत विकासाकाने सुविधां न देता प्लॉट विक्री सुरू केली आहे त्याबाबत चौकशी करून कारवाई करणे आदी विषयांवर नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला. पशुधन विकास अधिकारी डॉ. परमेश्वर दुडोळे यांनी विविध योजनांचा लाभासाठी पशुचे आधार कार्ड काढण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
बस स्थानक परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना, नागरिकांना बसण्यासाठी जागा नाही. तसेच बस फिरण्यास जागा शिल्लक नाही. बस स्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी शिवसेना शिंदे गटातील तालुका उपाध्यक्ष भीमराव कोळी यांनी केली.
ग्रामसभेस उपसरपंच दीपक जमादार, शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, सामाजिक कार्यकर्ते अजितसिंह जमादार, सुनील शिरसाठ, संदीप पाटील, प्रेमचंद शिरसाठ, राजेंद्र सावळे, भूषण तलवारे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष कुबेर जमादार, बबलू मराठे, रुपेश निकम,अरुण रायसिंग, दिनेश महाले, हरपाल जमादार, दत्तू कोळी ,मनोज कोळी ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी, प्रदीप देवरे, अनिल मराठे, विलास सोनवणे,मोतीसिंग भिल मंगलाबाई कोळी, प्रतिभाबाई कोळी, छायाबाई पाटील व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
