शहादा-येथील जिजाई अकॅडमी तर्फे पोलीस भरती चे हुबेहूब प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन
शहादा-येथील जिजाई अकॅडमी तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस भरती चे हुबेहूब प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन करून दाखविल्याने परिसरातील विद्यार्थ्यांचे पालकांनी कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोलीस भरतीचे मोफत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दोंडाईचाचे उद्योगपती विकासरत्न सरकारसाहेब रावल हे होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजाई अकॅडमी चे संचालक भारतीय सेना दलाचे सेवानिवृत्त हवालदार श्री गजेंद्र सिंग गिरासे सर हे होते. याप्रसंगी जिजाई अकॅडमी चे सचिव मेजर जयदीप गिरासे यांच्या पत्नी मायाताई जयदीप गिरासे, अनरद येथील सरपंच किशोर निकुंब, तलाठी यशवंत मराठे, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
जिजाई अकॅडमी च्या विध्यार्थी नी अतिशय हुबेहूब सैनिकी छावणी प्रमाणे संचालन करून ध्वजाला मानवंदना दिली.
त्यानंतर पोलीस भरती ची मैदानी चाचणी व लेखी चाचणी हवालदार गजेंद्र सिंग गिरासे मार्गदर्शन व माहिती देऊन गुण जाहीर केले. शहादा तालुक्याचे तहसीलदार श्री दीपक गिरासे साहेबाच्या हस्ते बक्षिसाचे वितरण केले. त्यात मुलामधून प्रथम पारितोषिक प्रदीप पाटील, द्वितीय राहुल भदाणे ,तृतीय भरत भालकरे तर मुलीमधून प्रथम पारितोषिक तुलसी शेमळे हिने पटकाविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज साबळे सरांनी केले तर श्री संदीप प्रभुके यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
