शहादा तालुक्यातील मंदाने येथील श्रीराम मंदिराची सजावट व कळस उभारणी संपन्न नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी समितीचे




शहादा तालुक्यातील मंदाने येथील श्रीराम मंदिराची सजावट व कळस उभारणी संपन्न

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी समितीचे

येत्या २२तारखेला समंध भारतीयांची पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपुन अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत, अर्थातच प्रभू श्रीरामांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात सगळ्या मंदीरांची रंगरंगोटी व सजावट केली जात आहे, आमच्या मंदाणे गावातही प्रभू श्रीरामांचे प्राचीन मंदिर आहे.त्या मंदिराची डागडुजी व नविन कळस उभारणी करुन रंगरंगोटी करण्यात आले.मला  मंदाणे गावावर विशेष प्रेम असणारे व मंदाणे गावाच्या तळागाळातील प्रत्येकासाठी धावुन येणारे,ज्यांच्याकडे शब्द टाकला म्हणजे काम होतेच असे आपल्या शहादा तळोदा मतदार संघाचे लोकप्रिय व कार्यक्षम आमदार मा.राजेशदादा पाडवी यांनी मागे मंदिराच्या कळस उभारणीसाठी रुपये ३१हजार व आत्ता मंदीर रंगरंगोटीसाठी सुध्दा ३१हजार रुपये अशी भरीव देणगी दिली,त्याबद्दल  शरद साळुंखे उपसरपंच व सौ.सुशिलाबाई पंडित भिल सरपंच या नात्याने मा.आमदार साहेबांचे मंदाणे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने  आम्ही आभार मानतो. असे वक्तव्य सरपंच यांनी केले आहे. व दिनांक 22 जानेवारी रोजी भाविकांनी या मंदिरास भेट देऊन श्रीरामांचे दर्शन घ्यावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने