नवापुर-पुणे बस चा कोंडाईबारी घाटात अपघात*




*नवापुर-पुणे बस चा कोंडाईबारी घाटात अपघात*

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पुणे या बसचा कोंडाईबारी घाटात अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार नवापूर पुणे बस चा अपघात झाला आहे .सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH 20 बी एल 3201 हिच्या कोंडाईबारी घाटात अपघात झाला आहे सदर,अपघात हा नवापुर पुणे   बस क्रमांक MH 20 BL 3201 चा कोंडाई बारी घाटात असून जखमींना   विसरवाडी रुग्णालयात ॲम्ब्युलन्स मध्ये  रवाना करण्यात आले आहेत. अंदाजानुसार  सुमारे 14 ते 15 प्रवाशी जखमी झालेले असुन सर्वाधिक प्रवासी हे नवापूर तालुक्यातील आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने