*राहुरी वकिल दाम्पत्य हत्येचा दोंडाईचा वकील संघातर्फे निषेध*
दोंडाईचा अख्तर शाह
दोडाईचा बार असोसिएशन अर्थात वकील संघातर्फे राहुरी जिल्हा नगर येथील विधीतज्ञ पती पत्नी आढाव दाम्पत्य हत्येचा जाहीर निषेध करुन अपर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. वकील संघाने निवेदन म्हटले आहे की पती राजाराम व पत्नी मनिषा आढाव वकील दाम्पत्याला ओळखीचे पक्षकारांनी निर्घृणपणे हत्या करुन मृत्यूदेह दगड बांधून विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे वकील क्षेत्रात खळबळ माजली वकील क्षेत्रात काम करत असतांना न्यायदानाला उशीर होत असल्याने पक्षकार हतबल होतात त्यातून वकीलांची हत्या करण्यापर्यंत मजल जाते यामुळे वकीलांना अधिवक्ता संरक्षण अधिनियम कायदा लागू करुन वकील लोकांना संरक्षण देण्यात यावे व हत्येचा योग्य तपास करुन जलदगती न्यायालयात खटला चालवा अशी मागणी अपर तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी सोनार यांच्याकडे केली आहे. निवेदनावर दोंडाईचा वकील संघाचे प्रभारी अध्यक्ष ऍड . जे. व्ही. तायडे, सचिव ऍड ज्ञानेश्वर पाटील, सदस्य ऍड . नितीन आयाचित, ऍड एकनाथ भावसार, ऍड मनिष रुपचंदाणी, ऍड आर. आर. राजपूत,अड. प्रमोद मराठे, ऍड मनिष शहा, ऍड रविंद्र मोरे पाटील, ऍड अशोक पाटील, अँड . संतोष भोई, अड. सचिन चौधरी, ऍड अरुण माळी, ऍड जतिन वाघेला, ऍड . पंकज पाटोळे, ऍड रामकृष्ण धनगर,ऍड . महेंद्र जाधव, ऍड . सौरभ भावसार, ऍड प्रतिक पाटील,ऍड . आदित्य आयाचित, ऍड . आशा मंसुरी, ऍड मनिषा वाघ, ऍड चेतन पाटील, ऍड ईशी यांनी सह्या करुन शासनाकडे मागणी केली आहे...
