*ईवीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्या,बिरसा फायटर्सची मागणी*
*केन्द्रीय निवडणूक आयोगाला तहसीलदारांमार्फत निवेदन*
शहादा: आगामी लोकसभा निवडणूकीत मतदान ईवीएम मशीन द्वारे न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावे,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने आयुक्त केन्द्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,आकाश तडवी,टिनू पावरा,प्रदीप पावरा,योगेश पावरा आदि बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,आपल्या भारत देशात ईवीएम मशीन द्वारे मतदान घेतले जाते. हे ईवीएम हे इलेक्ट्रॉनिक मशीन असून हॅक करता येते,मतांमध्ये हेराफेरी करता येऊ शकते,असे मतदारांचे म्हणणे आहे.येत्या लोकसभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ईवीएम मशीनचा वापर करण्यास येऊ नये.मतदानासाठी बॅलेट पेपर चा वापर करण्यात यावा.ईवीएम मशीन बाबत सर्वसामान्य जनतेत शाशंकता आहे.ही दूर करण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपर वर घेण्यात यावे,हीच नम्र विनंती.अन्यथा आगामी लोकसभा निवडणूकीत बिरसा फायटर्स संघटनेतर्फे देशभर मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने दिला आहे.
