सरस्वती विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा*




*सरस्वती विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा*

शिरपूर - श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती शिशु प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  माननीय डॉ. नितीनजी वैद्य यांच्या शुभहस्ते भारत माता प्रतिमा पूजन करण्यात येऊन ध्वजारोहण माननीय ॲड. सुहासजी वैद्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
ध्वजारोहणाचा कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आप्पासो दिलीप  लोहार उपाध्यक्ष श्री अरविंद वैद्य श्री प्रभाकर भाऊ शिंपी श्रीमती शोभाताई मोरे श्री महेश लोहार श्री अनिल अग्रवाल श्री राधेश्याम गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. सूत्रसंचालन श्री. व्हि.जे.बागुल सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने