धडगाव तालुक्यातील लाकूड तस्करी विरोधात वनविभाग ॲक्शन मोडवर नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे



धडगाव तालुक्यातील लाकूड तस्करी विरोधात वनविभाग ॲक्शन मोडवर  नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात सातपुडा च्या पर्वत रांगेत मोठ्या प्रमाणात खैर आणि सागवान झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात लाकूड तस्कर यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने वन विभाग आता ॲक्शन मोडवर आलेला आहे.. वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीचा आधारावर धडगाव परिक्षेत्रातील राजबर्डी गावात अवैद्य पद्धतीने लाकडांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच वन विभागाची टीम त्या ठिकाणी पोचली मात्र वन विभागाचा टीमला चकवां देत पुष्पा स्टाईल ने तस्करांनी तिथून पळ काढला.. राजबर्डी पासून 35 पस्तीस किलोमीटर पर्यंत वन विभागाने वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला मात्र अंधाराच्या फायदा घेत लाकूड तस्करांनी लाकडं रस्त्यावरच फेकून त्या ठिकाणाहून पड काढला. या कारवाईत वन विभागाने काथा बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खैर जातीचे 52 हजार 850 रुपयांची एकूण 64 नग लाकडं जप्त धडगाव वन विभागाने जप्त केले असून वन गुन्हा कायद्याअंतर्गत अज्ञात तस्कराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयास्पद्य वाहनाचा तपास घेतला जात असून पुढील तपास वनपाल बी एम परदेशी करत आहे..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने