दोडाईचा येथे नूतन विद्यालयात सांस्कृतिक व बक्षीस वितरण समारंभ दोंडाईचाअख्तरशाह.



दोडाईचा येथे    नूतन विद्यालयात सांस्कृतिक व बक्षीस वितरण समारंभ
दोंडाईचाअख्तरशाह.

दोडाईचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी  अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळणे आवश्यक आहे .संस्कारक्षम उत्तम शिक्षणासाठी पालकांनी मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनासह ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शहर ग्रामीण भागातील मुले मुलींनी शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी वाटचाल केली असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री डॉ हेमंतराव देशमुख यांनी नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सांस्कृतिक व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
अध्यक्षस्थानी चेअरमन माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव अमित दादा पाटील माजी नगराध्यक्षा सौ जुईताई देशमुख पाटील, संचालिका अनिताताई देशमुख प्रशासकीय अधिकारी गणेश चव्हाण, माजी सभापती महेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष पूजा खडसे, शिवसेनेचे ,उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, जितेंद्र चव्हाण,अमर मराठे राज ढोले, हरेश आव्हाड, पत्रकार बांधव आदी मान्यवर उपस्थित होते.
     मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ बी बी पाटील यांनी केले.
 सांस्कृतिक कार्यक्रमाला गणेश वंदनाने प्रारंभ झाला.
उडी उडी जाय, महाशिवरात्री निमित्त नमो नमो,,उभारा रे गुढी, रामायण एक कथा आदी गाण्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतले.उदो उदो अंबाबाईचा उदो, बचपन कहा, बद्री की दुल्हनीया, मल्हारी, छत्रपती शिवाजी महाराज( शिवजयंती) गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, ढोल बाजे, वूमन एम्पाॅरमेंट डान्स,, घर मोरे परदेसीया, देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले
आदर्श विद्यार्थी, श्रुती योगेश कुलकर्णी, पुष्पक संभाजी माळी, संकेत हालोर, कावेरी माळी, आदित्य पाटील,प्रेरणा सोनवणे उत्कृष्ट क्रीडा खेडाळू मंगला ईला वळवी यांचा कार्यक्रम दरम्यान सत्कार करण्यात आला. तद्वतच सांस्कृतिक, क्रीडा विभाग, बाह्य परीक्षा, विज्ञान विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सेवानिवृत्त प्राचार्य ए डी पाटील, श्रीमती नीता चव्हाण, शकुंतला पाटील, ललिता निकम, श्रीमती प्रतिभा वाघ, सौ रेखा पाडवी मुख्याध्यापक एस सी पाटील, प्रकाश माळके ,अनिल अहिरे, सदाशिव भलकार आदी मान्यवर उपस्थित होते प्राचार्य डॉ बी बी पाटील, उपमुख्याध्यापक ए जी पाटील समन्वयक डी एम चौधरी पर्यवेक्षक बी एच पाटील सी एस पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख एस बी पाटील उपप्रमुख ज्योती देसले, देवयानी निंबाळकर,एन पी बागल.शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले. रमाकांत चव्हाण,नंदलाल बागल,एन एन पाटील ,पी आर देवरे संदीप पाटील यांनी सुत्रसंचलन केले. गणेश इंद्रेकर यांचा संस्थेचे चेअरमन डॉ रविंद्र देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने