जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूल मधील दोन विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये सहभाग
शिरपूर (प्रतिनिधी )-शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित वाघाडी ता.शिरपूर येथील जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूल मधील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये निवड झाली . हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र व हँडबॉल असोसिएशन ऑफ वर्धा डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ राज्यस्तरीय हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२३ -२४ या स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी शैलैश भामरे , उज्वल मराठे हे विद्यार्थी धुळे संघाकडून खेळले . या विद्यार्थ्यांना हँडबॉल खेळाचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षक श्री. सचिन सिसोदिया सरांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे सीईओ आदरणीय डॉ. उमेश शर्मा सर , प्राचार्या सौ. मेघा मुंगसे मॅडम व शाळेतील सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय खेळासाठी कौतुक केले.
